आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये झालेल्या बलात्कार घटनेतील पीडितेची मृत्यूशी सुरु असलेली झुंज आज अपयशी ठरली आहे. दिल्लीतील निर्भयाप्रमाणे पाशवी कृत्य तिच्यावर करण्यात आले. या घटनेचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे आणि ही माणसं इतकी पाशवी कशी असू शकतात असा संतप्त सवाल फडणवीसांनी केला आहे.
फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी
या प्रकरणाविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, साकीनाकामध्ये घडलेला प्रकार आणि पीडितेचा झालेला मृत्यू हा संपूर्ण प्रकार मन सुन्न करणारा आहे. गेल्या महिनाभरापासून बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासोबतच मुंबई हे शहर महिलांसाठी सुरक्षित मानले जाते. मात्र ही घटना मुंबईत असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी असल्याचेही ते म्हणाले. तसेच या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. ते म्हणाले की, या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक व्हावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण नेऊन त्या माध्यमातून आरोपींना शिक्षा व्हावी, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी.'
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, साकीनाका, अमरावती, पुण्यामधील 3 घटना, पालघर, नागपूर या सर्व घटना भयंकर आहेत. मुंबई हे सुरक्षित शहर असल्याचा लौकिक आहे. मुंबईमध्ये रात्री महिलांना फिरण्यात कधीच अडचण येत नाही. मात्र या घटनांमुळे मुंबईच्या लौकिकाला धक्का पोहोचत आहे. तसेच येथील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. घडेला प्रकार हा माणुसकीला काळिमा फासणारा आहे. ही माणसे इतकी पाशवी कशी असू शकतात असा प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटना आहेत' असेही फडणवीस म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.