आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापेमारी:अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंबधी प्रकरणांमध्ये ईडीची छापेमारी, राज्यातील एका मंत्र्याचीही केली जाणार चौकशी

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने आज मुंबईमधील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंदर्भातील प्रकरणामध्ये ही छापेमारी करण्यात आली आहे. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एक मंत्रीही या प्रकरणात सहभागी असल्याची शंका ईडीला आहे. यामुळे या मंत्र्याचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.

1980 च्या दशकामध्ये दाऊद इब्राहिमने भारतसोडून परदेशात पळ काढला होता. आता तो परदेशात बसून देशामध्ये मोठे आर्थिक व्यवहार करत असल्याचा संशय ईडीला आहे. दरम्यान ईडीने दाऊदची बहीण हसीन पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापेमारी केली असल्याची माहिती आहे. मुंबईमधील डी कंपनीचा संबंध पंजाबपर्यंत असल्याची माहिती देखील समोर आली होती. या पंजाब कनेक्शनमुळे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून अंडरवर्ल्डचा वापर पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

काही दिवसांपूर्वीच भारतीय तपास यंत्रणांनी 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी अबु बाकर याला युएईमधून अटक केली आहे. तब्बल 29 वर्षानंतर तो यंत्रणांच्या हाती लागला आहे. तो दाऊदचा जवळचा सहकारी आहे. अबूला संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईमधून अटक करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...