आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीची घटना:डोंबिवली स्टेशनजवळील लक्ष्मीनिवास इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत

मुंबईमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली स्टेशन जवळील लक्ष्मीनिवास इमारतीला भीषण आग लागली आहे. लक्ष्मीनिवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही भीषण आग लागली. येथे गोदाम आहे या गोदामात आग लागली असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आग लागल्यानंतर येथील दुकानदारांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. इमारतीपासून जवळच पादचारी पूल आहे. आगीचे लोळ या पुलापर्यंत जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दुपारी जवळपास तीन वाजेच्या सुमारास ही आग लागली. सुदैवाने या घटनेत अद्याप पर्यत कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे डोंबिवली अग्निशमन केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...