आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकरीच्या आड काळा धंदा:मुंबईत केक आणि पेस्ट्रीतून ड्रग्स पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एनसीबीचा बेकरीवर छापा, तिघांना अटक

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मुंबईच्या मालाड येथील एका बेकरीमधून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाली

मुंबईत केक आणि पेस्ट्रीमधून चक्क ड्रग्सचा पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत एक मोठी कारवाई करत ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यांचा भांडाफोड केला आहे. बेकरीमध्ये तयार करण्यात येणाऱ्या केक आणि पेस्ट्रीत ड्रग्ज लपवून त्याचा पुरवठा केला जात होता. अखेर याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. यानंतर एसीबीने धाड टाकत या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन केक आणि पेस्ट्रीची ऑर्डर वाढली होती. दरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मुंबईच्या मालाड येथील एका बेकरीमधून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी संबंधित बेकरीमध्ये छापा टाकला. एका टब्ब्यात पोलिसांना 160 ग्राम गांजाही आढळला. पोलिसांनी बेकरीतील कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

महिलेसह तिघांना अटक
या प्रकरणामध्ये एनसीबीने एका महिलेसह आणखी दोन जणांना अटक केली आहे. या रॅकेटच्या मागे नक्की कोण आहे हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही. या प्रकरणी एनसीबी अधिक तपास करत आहे. यासोबतच या कारवाईतून ड्रग्ज माफियांच्या आणखी मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...