आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारायगड किनाऱ्याजवळ संशयास्पद बोट आढळली आहे. बोटीवर पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बोटीची नौदल आणि तटरक्षक दलाकडून तपासणी होत आहे.
काही महिन्यांपूर्वी रायगडच्याच श्रीवर्धन किनाऱ्यावर दोन बोटी भरकटत आल्या होत्या. या बोटींमधून स्फोटकेही जप्त करण्यात आले होते. यामध्ये घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अशी बोट खळबळ उडाली आहे.
नक्की प्रकरण काय?
मुंबई अरेबियन किनाऱ्यावर आज सकाळी एक बोट संशयास्पदरित्या दिसली. ही बोट रायगडच्या किनारपट्टीवर आढळल्याची माहिती समोर येत आहे. ही बोट नौदलाच्या हद्दीत सापडली आहे. त्यामुळे नौदल या बोटीची कारवाई करत आहे.
आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्यच्या सुमारास बोट दिसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबई पोलिस बंदर क्षेत्राला ही माहिती 10 वाजता देण्यात आली. ही बोट अडवण्यात आली असून त्यात काही पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत. रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
संबंधित वृत्त
संशयास्पद बोटींबाबत फडणवीसांचा खुलासा:बोट ऑस्ट्रेलियन महिलेची, भरसमुद्रातच बंद पडल्यानंतर भरकटत रायगड किनारी
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी 2 बोट संशयास्पदरित्या आढळल्याने जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पैकी एका बोटीत एके-47 रायफल्स व स्फोटके सापडले आहेत. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.