आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:एटीएस प्रमुख जयजीत सिंह ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त, तर विनीत अग्रवाल नवे एटीएस प्रमुख

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कालच राज्य सरकारने शासन यासंदर्भांत आदेश काढले आहे.

राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आलेली आहे. ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी अप्पर पोलीस महासंचालक पदी पदोन्नती मिळाल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तांची जागा रिकामी होती. कालच राज्य सरकारने शासन आदेश काढत जयजीत सिंह यांना ठाणे पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी दिली आहे. जयजीत सिंह यांच्या जागी आता गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) विनीत अग्रवाल यांची बदली करण्यात आलेली आहे.

तर विनीत अग्रवाल यांच्या जागी अपर पोलीस महासंचालक विशेष अभियानचे संजय सक्सेना यांची गृह विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे.जयजीत सिंह यांच्याकडे गेल्यावर्षी आॅक्टोंबर मध्ये एटीएस प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू होता.

बातम्या आणखी आहेत...