आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसुख हिरेन मृत्यू:मुंबईत मिठी नदीतून पाणबुड्यांनी काढले डीव्हीआर, नंबर प्लेट, सीपीयूसारखे पुरावे; वाझेला घेऊन एनआयए पथक नदीवर

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनआयए आता स्फोटके आणि हिरेन हत्या अशा दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अधिकारी रविवारी मुंबई पोलिसांतील निलंबित सचिन वाझे याला घेऊन थेट मिठी नदीवर पोहोचले. काही पाणबुड्यांच्या मदतीने नदीतून दोन नंबर प्लेट, सीपीयू, हार्डडिस्क आणि डीव्हीडीसारखे पुरावे बाहेर काढले. हे सर्व पुरावे कार डेकोरेटर मनसुख हिरेन याच्या हत्येशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिअो गाडीबद्दल हिरेन यांनी दावा केला होता की, ही गाडी काही दिवसांपासून त्यांच्याकडे होती. यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृतदेह ठाण्यात खाडीमध्ये सापडला होता. या प्रकरणात अँटिलियासमोर स्फोटके भरून गाडी उभी करण्यासह हिरेन यांच्या हत्येत पोलिस अधिकारी सचिन वाझे हाच मुख्य आरोपी असल्याचे मानले जाते. एनआयए आता स्फोटके आणि हिरेन हत्या अशा दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहे. वाझे आणि त्याच्या साथीदारांनी या दोन्ही प्रकरणांतील पुरावे नदीत फेकले असावेत, अशी एनआयएला शंका होती. एनआयए सूत्रांनुसार, या हत्याकांडात वाझेशिवाय आणखी काही लोक सहभागी आहेत. लवकरच सर्व गुन्हेगार सापडतील. एनआयएने याप्रकरणी वाझे, सट्टेबाज नरेश आणि मुंबई पोलिसांतील माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांची समोरासमोर बसवून चौकशी केली आहे.

अनेक महत्त्वाचे पुरावे : एनआयएने तपासात आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरावे मिळवले असून यात १.२ जीबी डाटा, वेगवेगळे मोबाइल फोन, जळालेले कपडे आणि काही कागदपत्रे जप्त केली आहेत.

बातम्या आणखी आहेत...