आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरागस बाळांचे शत्रू:मुंबईमध्ये मुलांना विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एक डॉक्टर, नर्ससह 9 लोकांना पोलिसांनी केली अटक

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका डॉक्टरला करण्यात आली अटक

क्राइम ब्रांच शाखा यूनिट-1 ने नवजात मुलांच्या खरेदी-विक्रीच्या आरोपात 9 लोकांना अटक केली आहे. तपासात समोर आले आहे की, गेल्या 6 वर्षांमध्ये या टोळीने 7 मुलांना विकले आहे. पण मुलांची संख्या जास्त असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे 60 हजारात मुलीला आणि 3.5 लाख रुपयांमध्ये नवजात बाळाला विकत होते. अटक केलेल्या आरोपींच्या विरोधात आयपीसी आणि जुवेनाइल जस्टिस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका डॉक्टरला करण्यात आली अटक
पोलिसांनी गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या आरोपींना अटक केली आहे, त्यामध्ये आरती सिंग, रुख्सार शेख, रुपाली वर्मा, निशा अहिर, गीतांजली गायकवाड आणि संजय पदम यांचा समावेश आहे. यांच्या ठिकाणावर धनंजय बोगा (58) नावाच्या डॉक्टरांनाही पोलिसांनी सोमवारी अटक केली. याने एका मुलीला विकण्याच्या प्रकरणात 30 हजार रुपयांचे कमीशन घेतले होते. टोळीची संचालिका बांद्रा येथे राहणारी आरती नावाची एक पॅथोलॉजी लॅब टेक्नीशियन आहे. ती गीतांजली नावाच्या नर्ससोबत मिळून ही टोळी चालवत होती.

व्हॅट्सअॅप चॅटने झाला खुलासा
सीनियर पीआय योगेश चव्हाण यांनी सांगितले की, यांच्याजवळून अनेक मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहे. यामध्ये मुलांचे फोटो आणि व्हॉट्सअप चॅट सापडले आहेत. जे हे सिद्ध करतात की, या टोळीचे सदस्य अशा लोकांना टार्गेट करत होते जे खूप गरीब असायचे आणि 2.5 लाख ते 3.5 लाखांमध्ये आपल्या इच्छेने मुलं विकून टाकत होते. चव्हाण यांनी सांगितले की, आमच्या टीमला टोळीविषयी सूचना मिळाल्या होत्या.

अशा आरोपींपर्यंत पोहोचले पोलिस
पोलिसांना कळाले की, रुख्सार शेख नावाच्या एका व्यक्तीने नुकतेच एक बाळ विकले आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली तेव्हा कळाले की, शाहजहा जोगिलकर यांनी रुपाली वर्माच्या माध्यमातून आपल्या मुलाला पुण्याच्या एका कुटुंबाला विकले होते. हे शाहजहां यांचे दुसरे बाळ होते. 14 जानेवारीला पोलिसांच्या टीमने रुख्सार, शाहजहां आणि रुपालीला अटक केली होती. चौकशीत त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.

अनेक लोक एजेंट म्हणून काम करतात
शेख यांनी पोलिसांना सांगितले की, 2019 मध्ये त्यांनी आपल्या मुलीला 60,000 आणि 1.50 लाखमध्ये मुलाला रुपालीच्या माध्यमातून विकले होते. शाहजहां यांनी सांगितले की, 2019 मध्ये तिने आपल्या मुलाला 60,000 रुपयांमध्ये धारावी येथील एका कुटुंबाला विकले होते. रुपालीने खुलासा केला की, हिना खान आणि निशा अहिर सर्व एजेंटच्या रुपात काम करत होत्या.

सीनियर पीआय योगेश चव्हाण यांनी सांगितले की, या प्रकरणात एक एनजीओ संचालिकाही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. सध्या ती फरार आहे. चव्हाण यांनी सांगितले की, 'टोळीद्वारे विकलेल्या सात मुलांमधून आम्ही सहा जणांचा शोध घेतला आहे. त्यांना अटकेत घेणे आणि मुलांच्या घरी पाठवण्याऐवजी आम्ही बाल कल्याण समिती (सीडब्ल्यूसी)ला या मुद्द्याविषयी सूचित केले आहे.'

बातम्या आणखी आहेत...