आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील आँखो देखा हाल:मुंबई : आता हाउसिंग साेसायट्या,पाॅश भागांमध्ये काेराेनाचा कहर

मुंबई ( विनाेद यादव )10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मायानगरीत कोरोनामुळे रुग्णांची संख्या वाढतेय, प्रशासनाचे प्रयत्न सुरू
  • आयसीयू-व्हेंटिलेटरचा तुटवडा, व्यवस्थेवर प्रचंड ताण, २३ शिल्लक
  • बाेरिवलीमध्ये १६ दिवसांत रुग्णसंख्या दुपटीवर, धारावीत ७६ दिवसांत वाढ
  • मुंबईच्या एकूण साडेतीन लाख दुकानांपैकी ३० टक्के राेज सुरू

मुंबईत मंगळवारी काेराेनाचे ८२४ नवे रुग्ण आढळून आले. ४० दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे, परंतु काेराेनाचा कहर आता झाेपडपट्टीत कमी झाला असून हाउसिंग साेसाट्या तसेच उच्चभ्रू भागात दिसू लागला आहे. संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण बाेरिवलीसारख्या पाॅश भागात वाढताना दिसून आले. येथे १६ दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट झाली. आधी धारावीत ७६ दिवसांत बाधितांचे प्रमाण दुप्पट झाले हाेते.

काेराेना टास्क फाेर्सचे प्रमुख डाॅ. संजय आेक यांनाही काेराेनाची बाधा झाली आहे. ते म्हणाले, मुंबईत आता १३ दिवसांएेवजी ३७ दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट हाेत आहे. आधी ७ दिवसांत ५ टक्के या प्रमाणात पाॅझिटिव्ह केसेस आढळत हाेत्या. आता त्यात १.८८ टक्के अशी घट झाल्याचे दिसते. आयसीयू केअरची मागणी वाढू लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुंबईत आयसीयू व व्हेंटिलेटरची संख्या पाहिल्यास व्यवस्थेवर प्रचंड ताण असल्याचे जाणवते. मुंबईतील आयसीयूची संख्या १२१९ आहे. त्यापैकी केवळ ७२ रिक्त आहेत. व्हेंटिलेटर ७०१ उपलब्ध आहेत. परंतु त्यापैकी केवळ २३ सध्या उपलब्ध आहेत. मुंबईत आतापर्यंत ४६ पाेलिस व महापालिकेच्या ७० कर्मचाऱ्यांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे.बीएमसीने कंटेनमेंट झाेनची संख्या वाढवून ७७० वर नेली आहे. ५ हजार ९३२ रहिवासी भाग सील केले. त्यात चाळींचाही समावेश आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याचे पाहून प्रशासनाने बाेरिवली, कांदिवली, मालाड, दहिसर या भागात लाॅकडाऊनचा प्रस्ताव दिला आहे. या उपनगरांची एकूण लाेकसंख्या सुमारे २३ लाख आहे. बाेरिवली रेड झाेन आहे. शेजारचा दहिसर आॅरेंज झाेनमध्ये येताे. श्री विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या भागात अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करणारे समाजसेवक रामा विश्वकर्मा म्हणाले, बाेरिवलीमध्ये ७ दिवसांत ४५४ व दहिसर-२८९ काेराेनाबाधित वाढले आहेत. बाेरिवलीत १६ दिवस व दहिसरमध्ये २१ दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट हाेत आहे.

१२ लाख लोक मूळ गावी परतले, आता १५ हजार मजूर येताहेत
लॉकडाऊनमुळे १२ लाखांहून जास्त कामगारांनी पलायन केले होते. परंतु सध्या मुंबईत दररोज सुमारे १० ते १५ हजारावर परराज्यातील मजूर परतू लागले आहेत, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. चित्रपट क्षेत्रातील कामे ठप्प आहेत. विविध मागण्यांची पूर्तता हाेईपर्यंत चित्रीकरणात सहभागी हाेणार नसल्याचा निर्णय प्रमुख संघटनांनी घेतला आहे.

लाइफलाइनची चाके रुतली, पण २,७८६ बसेस धावू लागल्या..
काेराेनामुळे मुंबईची जीवनवाहिनी अर्थात उपनगरीय रेल्वेसेवेला फटका बसला. मध्य रेल्वेत काेराेना महामारीपूर्वी सुमारे १ हजार ७७४ लाेकलची सेवा हाेती. त्यातून दरराेज सुमारे ४३ लाख लाेक प्रवास करत हाेते. परंतु सध्या केवळ २०० लाेकल रेल्वे चालू आहेत. त्यातून सुमारे ७० ते ८० हजार लाेक प्रवास करत आहेत. पश्चिम रेल्वे विभागात १३०० वर लाेकल सेवेत हाेत्या. सध्या २ हजार ७८६ बस सुरू आहेत.
महाराष्ट्रात ६०० डॉक्टर, १ हजाराहून जास्त पोलिस बाधित

आयएमएच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात कोरोनामुले ११ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. त्यात ५ मुंबईचे आहेत. सुमारे ६०० डॉक्टर बाधित आहेत. त्यात १५० मुंबईतील आहेत. बॉलीवूड स्टार तसेच नेत्यांवर उपचार करणारे डॉ. जलील पारकर देखील बाधित आहेत. राज्यात एकूण १०३४ पोलिस व अधिकारी बाधित आहेत. त्यापैकी ४९ जणांचा मृत्यू झाला असून नगर पालिकेच्या ७० कर्मचाऱ्यांनाही प्राण गमवावे लागले. 30% दुकाने, माॅल, सिनेमागृहांना दरराेज ५०० काेटींचा फटका

कोरोना काळ
फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असाेसिएशनचे वीरेन शहा म्हणाले, लाॅकडाऊनपासून आतापर्यंत मुंबईतील दुकाने, माॅल व सिनेमागृहे बंद पडली आहेत. त्यामुळे दरराेज सुमारे ५०० काेटी रुपयांहून जास्त आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मुंबईत सुमारे साडेतीन लाख दुकानांपैकी केवळ ३० टक्के दुकाने राेज सुरू आहेत. डिस्टन्सिंगचे कडक पालन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...