आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईच्या वरळी भागात राहणाऱ्या 31 वर्षाच्या बँक अधिकाऱ्याचा मृतदेह 12 तुकड्यांमध्ये रायगड जिल्ह्याच्या नेरळ परिसराच्या एका नाल्यातून सापडला. मृतदेहाचे तुकडे करुन दोन सूटकेसमध्ये भरुन फेकण्यात आले होते. शुक्रवारी या प्रकरणात पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे, जे मृतकाचे मित्र होते. सुरुवातीच्या चौकशीत खुलासा झाला की, मृतकने बोलताना आरोपी महिलेच्या चरित्राविषयी काही टीप्पणी केली होती. जी पतीला आवडली नव्हती आणि त्या दोघांनी त्याचा जीव घेतला.
सहलीला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती व्यक्ती
सुशील कुमार सरनाईक असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सरनाईक हे मुंबईतील एका खासगी बँकेच्या ग्रँटरोड शाखेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करत होते. 12 डिसेंबर रोजी त्याने आपल्या आईला मित्रांसमवेत सहलीला जात असल्याचे सांगितले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो परत आला नाही, तेव्हा सरनाईकची आई तेथे काम करणाऱ्यांची विचारपूस करण्यासाठी बँकेत गेली, परंतु कोणालाही त्याची माहिती नव्हती.
अशा प्रकारे बँकेच्या अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला
वरळीचे वरिष्ठ निरीक्षक सुखलाल वरपे म्हणाले की, 14 डिसेंबर रोजी महिलेच्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आम्ही तपास सुरू केला तेव्हा सरनाईकचे शेवटचे मोबाइल लोकेशन नेरळमध्ये सापडले ज्याबद्दल आम्ही स्थानिक पोलिसांना कळवले. गुरुवारी सकाळी नेरळ पोलिसांनी आम्हाला फोन करून सरनाईकच्या मृतदेहाची माहिती दिली.
सुटकेसच्या सहाय्याने पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले
सरनाईकच्या आई-वडिलांनी त्याचा मृतदेह ओळखला. नेरळ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि सुटकेसवरील स्टिकरच्या सहाय्याने ते विकणार्या दुकानदारांकडे पोहोचले. दुकानदाराने सूटकेस विकत घेतलेल्या व्यक्तीचे सीसीटीव्ही छायाचित्रे पोलिसांकडे दिली. छायाचित्रांच्या मदतीने पोलिसांनी चार्ल्स नाडर आणि त्यांची पत्नी सलोमी यांच्यापर्यंत पोहोचली. पोलिसांनी नेरळच्या राज भाग सोसायटीमध्ये असलेल्या त्यांच्या घरातून ताब्यात घेत असताना या दोघांनाही विचारपूस केली असता त्यांनी सरनाईकची हत्या केली असल्याचे स्वीकारले.
आक्षेपार्ह भाष्यावरुन पती-पत्नी होते नाराज
आरोपींनी चौकशी दरम्यान सांगितले की सरनाईक आणि सलोमी यापूर्वी कॉल सेंटरमध्ये काम करायचे आणि हे दोघे मित्र होते, म्हणून तो या जोडप्याच्या घरी जात येत होता. 12 डिसेंबरच्या रात्री, नशेत झालेल्या संभाषणादरम्यान सरनाईक सलोमीच्या चरित्रांबद्दल बोववा, चार्ल्सला हे आवडले नाही आणि चिडलेल्या चार्ल्सने चाकूने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारले.
मृताचा हात अद्याप सापडलेला नाही
यानंतर आरोपी पती-पत्नीने सुटकेस विकत घेऊन मृतदेहाचे 12 तुकडे केले आणि ते सूटकेसमध्ये भरून नाल्यात फेकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरनाईकचा हात अद्याप सापडलेला नाही. अटक केलेल्या आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता तिथून पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.