आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईत ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेने खासगी रुग्णालयांसाठी नवीन गाइडलाइन जारी केली आहेत. सर्व खाजगी रुग्णालयांना सांगण्यात आले आहे की, दुसऱ्या लाटेदरम्यानच्या अॅक्टिव्ह कोविड बेडला पुन्हा अॅक्टिव्हेट करावे. यावरून मुंबईची परिस्थिती लवकरच बिघडणार आहे, हे सिद्ध होते. लक्षणे नसलेले रूग्ण कोमोर्बिड असल्यास त्यांना रूग्णालयात दाखल करावे आणि जर ते आधीच दाखल असतील आणि बेडची कमतरता असेल तर त्यांची प्रकृती पाहून त्यांना 3 दिवसांच्या आत डिस्चार्ज द्यावा, असेही सांगण्यात आले आहे.
मुंबईमध्ये स्लमपेक्षा जास्त बिल्डिंगमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामुळे बीएमसीने बिल्डिंग सील करण्याच्या नियमांमध्येही बदल केले आहे.
ही आहे BMC ची नवीन गाइडलाइन
बिल्डिंग सील करण्याच्या प्रोटोकॉलमध्ये बदल
बीएमसी कमिशनर इक्बाल सिंह चहल यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार बीएमसीने इमारत सील करण्याच्या प्रोटोकॉलमध्ये बदल केला आहे. त्यानुसार एखाद्या इमारतीच्या विंग, कॉम्प्लेक्स किंवा सोसायटीच्या 20 टक्के फ्लॅटमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाईल. रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. कोरोना रुग्णाला 10 दिवस आयसोलेटेड राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
इमारत सील करण्याची प्रक्रिया प्रभाग स्तरावर असणार
हाय रिस्क असलेल्या लोकांना 7 दिवस अनिवार्यपणे क्वारंटाइन ठेवणे आवश्यक आहे. पाचव्या आणि सातव्या दिवशी त्यांची कोरोना चाचणी करावी लागणार आहे. सोसायटी मॅनेजिंग कमिटी क्वारंटाईन केलेल्या कुटुंबासाठी रेशन, औषध आणि इतर आवश्यक साहित्य पुरवेल. इमारत सील करण्याची प्रक्रिया प्रभाग स्तरावर केली जाणार आहे. कोरोनाबाबत वैद्यकीय अधिकारी किंवा वॉर्ड ऑफिसर यांनी जारी केलेले प्रोटोकॉल आणि प्रतिबंधात्मक नियमांचे लोकांना काटेकोरपणे पालन करावे लागेल.
गेल्या 24 तासात 15 हजारांपेक्षा जास्त संक्रमित
मुंबईमध्ये बुधवारी कोरोना व्हायरसचे 15,166 नवीन केस नोंदवण्यात आले आहेत. तर शहरात पॉझिटिव्हिटी रेट 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरात 87 टक्के प्रकरणे लक्षणे नसणारी आहेत. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 61,923 झाली आङे. मुंबईमध्ये कालच्या तुलनेत जवळपास 5 हजारांपेक्षा जास्त केस नोंदवण्यात आल्या आहेत. शहरात मंगळवारी कोरोना व्हायरसचे 10,890 केस समोर आले होते. तर मुंबई आणि याच्या उपगनरमध्ये सार्वजनिक बस चालवणाऱ्या बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय (BEST) सेवेचे गेल्या काही दिवसांत 66 कर्मचारी आणि अधिकारी संक्रमित आढळले आहेत.
कॉर्डेलिया क्रूझवरील 209 प्रवाशांना आतापर्यंत संसर्ग झाला आहे
कॉर्डेलिया क्रूझच्या 1827 प्रवाशांपैकी 143 प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. मंगळवारी मुंबई बीएमसीच्या पथकाने त्यांची चाचणी घेतली. यापूर्वी क्रूझमधील 66 प्रवाशांना संसर्ग झाला होता. त्यामुळे बाधितांची संख्या 209 झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.