आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा 26/11 ची धमकी:मुंबईतील हॉटेल ताजवर पुन्हा 26/11 स्टाइल दहशतवादी हल्ला करण्याची धमकी; महानगरासह तटवर्ती भागांत चोख बंदोबस्त

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

पाकिस्तानकडून पुन्हा मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी आली आहे. मुंबई पोलिसांनी या धमकीला गांभीर्याने घेत वेळीच ताज हॉटेलची चौकशी करताना गस्ती वाढवल्या आहेत. फोनवर एका व्यक्तीने सांगितले की, कराचीतील स्टॉक एक्सचेंजमध्ये साऱ्या जगाने दहशतवादी हल्ला पाहिला. आता ताज हॉटेलमध्ये 2008 च्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती होणार आहे. ही माहिती मिळताच हॉटेल परिसरात बॉम्ब स्क्वाड पाठवून छाननी करण्यात आली. सोबतच, हॉटेल परिसर आणि गेट वे ऑफ इंडिया येथे स्पेशल फोर्स मुंबई वनची टीम तैनात करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे.

हॉटेल ताजवर हल्ला करण्याच्या धमकीचे एकूण दोन फोन कॉल आले होते. यातील पहिला कॉल मध्यरात्रीच्या सुमारास ताज हॉटेलमध्ये आला. तर दुसरा कॉल वांद्रे येथील हॉटेल ताज लँड एंड्समध्ये आला होता. हे दोन्ही फोन कॉल एकाच नंबरवरून आले होते असे सांगितले जात आहे. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव सुलतान असल्याचे सांगितले. धमकी देणाऱ्याने आपला व्हॉट्सअप नंबर सुद्धा फोन करून दिला आहे. यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहे.

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. यात काही दहशतवादी हॉटेल ताजमध्ये घुसले होते आणि त्यानंतर भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चमकक उडाली होती. दहशतवाद्यांनी हॉटेलमधील पाहुण्यांचे अपहरण केले होते. यात 7 परदेशी नागरिकांचा समावेश होता. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी एनएसजी कमांडोंनी दहशतवाद्यांचा सामना केला. हॉटेल ताजमधील ऑपरेशन 29 नोव्हेंबर पर्यंत चालले. 60 तास चाललेल्या या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानहून एकूण 10 दहशतवादी भारतात घुसले होते. त्यापैकी काही हॉटेलमध्ये तर काही विविध ठिकाणी हल्ले करत होते. या हल्ल्यांमध्ये 28 परदेशी नागरिकांसह 166 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 300 हून अधिक लोक जखमी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...