आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअँटिलिया प्रकरणात आता दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती काही नवीन पुरावे लागले आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबई क्राईम इंटेलिजेंस यूनिटच्या सहाय्यक पोलिस निरिक्षक रियाजुद्दीन काझी याला अटक केली आहे. त्यांच्यावर मनुसुख हिरेन हत्या प्रकरणी वाझेला मदत आणि पुरावा नष्ट करण्याचा आरोप आहे. परंतु, सध्या त्याची बदली मुंबईच्या लोकल आर्म्स यूनिटमध्ये करण्यात आली आहे.
तपास यंत्रनेच्या माहितीनुसार, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात काझी संशयित आरोपी आहे. अँटिलिया प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेच्या सांगण्यावरुन हिरेन यांची हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने काझी यांची 15 मार्च, 16 मार्च, 17 मार्च, 20 मार्च, 23 मार्च, 26 मार्च और 27 मार्च असे एकून सात वेळा चौकशी केली आहे. एनआयएचे म्हणणे आहे की, रियाजुद्दीन काझीची भूमिका ही आधीपासूनच संशयित वाटत असून तो सचिन वाझेचा अत्यंत जवळचा साथीदार होता. त्यामुळे त्यांच्याकडून अनेक महत्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता एनआयएने वर्तवली आहे.
काझीने वाझेच्या सांगण्यावरुन पुरावे नष्ट केले
सुत्रांच्या माहितीनुसार, काझीने 26 फेब्रुवारी रोजी सचिन वाझे राहत असलेल्या साकेत सोसायटीमध्ये जाऊन तेथील CCTV, DVR ताब्यात घेतले. त्यानंतर ते नष्ट करुन मीठी नदीत फेकून दिले होते. त्यामुळे एनआयएकडून त्याची सतत चौकशी सुरु आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.