आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NSE फोन टॅपिंग प्रकरण:मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिल्ली हायकोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी जामीन मंजूर केला आहे. हा पांडे यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जातोय. ईडीने त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. मुंबई शेअर मार्केटमध्ये कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याचाआरोप यांच्या वरती करण्यात आलेला होता.

संजय पांडे यांना ईडीने 19 जुलै रोजी अटक केली होती आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले होते. ऑगस्टमध्ये ट्रायल कोर्टाने या प्रकरणात पांडेचा जामीन फेटाळला होता आणि सांगितले होते की, उपलब्ध सामग्रीवरून असे दिसून आले आहे की, ते NSE मधील कॉल रेकॉर्डिंग आणि मॉनिटरिंगच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी होते, आणि त्यांचा थेट कार्यालयीन कर्मचाऱ्यांशी संवाद होत होता.

रामकृष्ण यांनाही जामीन

ईडीने 14 जुलै रोजी फोन टॅपिंग प्रकरणी एनएसईच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना देखील अटक केली होती. एनएसईमधील को-लोकेशन घोटाळा प्रकरणी त्यांना 28 सप्टेंबर रोजी जामीन मंजूर झाला होता.

बातम्या आणखी आहेत...