आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Mumbai Police Commissioner Parambir Singh Transferred, New Responsibilities Of Home Guard; Hemant Nagarale Is The New Commissioner Of Police Of Mumbai

सरकारचा मोठा निर्णय:मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली, हेमंत नगराळे होणार मुंबईचे नवे पोलिस आयुक्त; गृहमंत्र्यांची घोषणा

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • परमबीर सिंह यांना होम गार्ड दलाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे

मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना आता होम गार्ड दलाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावरून जारी केली. मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी आता हेमंत नगराळे यांची निवड करण्यात आली आहे. अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून सततचे आरोप होत असतानाच महाविकास आघाडी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

अँटिलियाबाहेर ज्या कारमध्ये स्फोटके सापडली त्या कारच्या मालकाच्या मृत्यूनंतर एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना गुन्हे शाखेतून काढून नंतर निलंबित केले. मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यासाठी ठाकरे सरकारच्या बैठकांवर-बैठका आयोजित करण्यात आल्या. त्यामध्येच मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याही बदलीचा निर्णय घेण्यात आला असे सूत्रांकडून समजते.

या बैठकांच्या दुसऱ्याच दिवशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिस आयुक्त पदावर परमबीर सिंह यांना हटवून त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांना आणल्याची घोषणा केली आहे. गृहमंत्र्यांनी जारी केलेल्या माहितीनुसार, हेमंत नगराळे मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त राहतील. रजनीश शेठ यांच्याकडे पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी देण्यात आली. आतापर्यंत मुंबईचे पोलिस आयुक्त राहिलेले परमवीर सिंह आता गृह रक्षक दलाची जवाबदारी सांभाळतील.

या कारणांमुळे चर्चेत राहिले हेमंत नगराळे

 • नवी मुंबईचे पोलिस आयुक्त असताना 2017 मध्ये वाशी येथील बँक ऑफ बरोडामध्ये चोरीचे प्रकरण त्यांनी दोन दिवसांत सोडवले होते.
 • पॉप सिंगर जस्टिन बीबरच्या कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्थेची योग्य जबाबदारी पार पाडल्याने त्यांना सरकारकडून सन्मानित करण्यात आले होते.
 • ड्युटीवर निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी त्यांना ओळखले जाते.
 • विधान परिषदेच्या मंजुरीशिवाय त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या विरुद्ध खटला दाखल केला होता. त्यामुळे, त्यांना यासाठी निलंबित करण्यात आले होते.
 • रायगड मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेत कर्ज वसूली करण्याच्या बाबतीत बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांच्या विरोधात त्यांनी एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला होता.

बातम्या आणखी आहेत...