आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा कहर:मुंबईत 32 वर्षीय पोलिस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, राज्यात आतापर्यंत 1140 पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील धारावी येथील शिबिरात तपासणीसाठी दाखल झालेला पोलिस कर्मचारी - Divya Marathi
मुंबईतील धारावी येथील शिबिरात तपासणीसाठी दाखल झालेला पोलिस कर्मचारी
  • महाराष्ट्र पोलिसांनुसार, राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 11 पोलिसांचा मृत्यू
  • मागील 24 तासांत राज्यातील 79 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका पोलिसांना बसला आहे. राज्यात आतापर्यंत 1 हजार 140 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. आज 32 वर्षीय पोलिस अमोल कुलकर्णी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेले ते सर्वात कमी वयाचे पोलिस कर्मचारी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी व 3 वर्षाची मुलगी आहे.. 

बाथरूममध्ये सापडला अमोल कुलकर्णी यांचा मृतदेह

मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले की, 32 वर्षीय सहायक पोलिस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांचा आज राहत्या घरी मृत्यू झाला. शनिवारी कोरोनाचा रिपोर्ट येण्यापूर्वीच त्या अधिकाऱ्याचा घराच्या बाथरुममध्ये मृत्यू झाला.  पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह त्यांच्या बाथरूममधून ताब्यात घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 13 मे रोजी अधिकाऱ्याची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.

लक्षणे न दिसल्यामुळे सतत ड्यूटीवर होते तैनात

मुंबई पोलिसांनुसार, पोलिस अधिकाऱ्यात कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसले नसल्याने त्यांना ड्यूटीवर तैनात करण्यात आले होते. त्यांची ड्यूटी साहूनगर पोलिस ठाण्यात होती. हा परिसर धारावी भागात येतो. अमोल कुलकर्णी यांच्या पश्चात पत्नी व 3 वर्षाची मुलगी आहे.

मागील 24 तासांत 79 पोलिसांना कोरोनाची लागण 

महाराष्ट्रात आतापर्यंत 1140 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 120 अधिकारी आणि 1020 कर्मचारी आहेत. मागील 24 तासांत 79 पोलिस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनुसार, राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 11 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...