आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशभर दहशत माजवणारा कोरोना व्हायरस आता मुंबईतील उच्चभ्रू अशा जुहू परिसरातील पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आहे. जुहू पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत एका हवालदाराचा कोरोना अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वच पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची आता चाचणी घेतली जात असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा पोलिस कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून आजारी होता असेही समोर आले आहे.
संबंधित पोलिस काँस्टेबल कांदिवली येथील रहिवासी आहे. तो गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणामुळे रजेवर होता. जुहू पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ वव्हाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यासोबतच सर्दी, खोकला आणि तापीसह कोरोनाची लक्षणे दिसून येत होती. यानंतर बुधवारी त्याच्या स्वॅबचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले. त्याचाच गुरुवारी पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्याच्यावर एका स्थानिक सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काँस्टेबलचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस स्टेशनमधील 7 ते 8 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे स्वॅबचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मुंबईत पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची ही दुसरी घटना आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.