आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईतील 9 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत नुकतंच परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांच्या बदली आणि स्थगिती प्रकरण चर्चेत होतं. यावरुन राजकारणही तापलेले दिसत होते. त्यानंतर आता नुकतंच 9 DCP अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आली आहे. यात आयपीएस आणि SPS (मपोसे) पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस दलातील 10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांतील गोंधळामुळं तयार झालेला वाद ताजा असतानाच पुन्हा एकदा गृह विभागाकडून बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. तसेच बदली करण्यात आलेल्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचा सूचना देखील पोलिसांना करण्यात आल्या आहेत.
या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
परमजीत सिंग दहिया - परीमंडळ 3
प्रशांत कदम - परीमंडळ 7
गणेश शिंदे - पोर्ट झोन ( बंदरे )
रश्मी करंदीकर - सायबर सेल
शहाजी उमप - विशेष शाखा 1
मोहन दहिकर - लोकल आर्मस ताडदेव
विशाल ठाकूर - परीमंडळ 11
प्रणय अशोक - परीमंडळ 1
नंदकुमार ठाकूर - क्राईम ब्रांच ( डिटेंशन )
दरम्यान मुंबई पोलीस दलातील 12 उपायुक्तांची दोन जुलैला बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र या मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालय कार्यालयाने या बदल्यांना स्थगिती दिली होती. मात्र यानंतर मोठा वाद निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीविनाच या बदल्या करण्यात आल्याच्या चर्चा सुरू होत्या. या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.