आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संपूर्ण कुटुंब निघालं चोर:तीन राज्यात 50 पेक्षा जास्त चोऱ्या करणाऱ्या कुटुंबाला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चोरीच्या एका घटनेनंतर या कुटुंबाबद्दल माहिती समोर आली

मुंबई पोलिसांच्या हाती मोठे यश आले आहे. महाराष्ट्र, तेलंगाणा आणि छत्तीसगडमध्ये 50 पेक्षा जास्त चोऱ्या केलेल्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफास केला. विशेष म्हणजे, या टोळीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. ही टोळी ज्वेलरी शॉपमध्ये चोऱ्या करायची. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 90 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

चोरीच्या एका घटनेनंतर या कुटुंबाबद्दल माहिती समोर आली

13 जानेवारीला कुरार परिसरातील मयुर ज्वेलर्समध्ये 10 तोळे दागिन्यांची चोरी झाली होती. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. दुकानाच्या मालकाने पोलिसांना सांगितले की, 13 जानेवारीला एक कुटुंब दागिने पाहण्यासाठी आले होते, ते निघून गेल्यावर चोरी झाल्याचे उघड झाले. दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये चोरीही घटना कैद झाली होती.

याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आणि 20 दिवसानंतर आरोपींना पुण्यातून अटक केली. रेखा वाणी (45), मुलगा अक्षय वाणी(19), दुसरा मुलगा शेखर वाणी(28), सुन रेणुका वाणी(23) आणि नरेंद्र साळुंखे(35) ला अटक केली आहे. यातील, रेखा वाणीचा पती हेमराज आणि नरेंद्र साळुंखेची पत्नी फरार आहे. यांचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...