आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीचा उत्साह:रंग बरसे भीगे चुनरवाली गाण्याची सुरेल मैफिल, मुंबई पोलिसांकडून बॅन्ड वाजवत होळी साजरी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशासह राज्यभरात होळीच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे. कोरोनाग्रस्त रुंगांची संख्या कमी असल्याने यंदा होळीचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यावेळी नेहमी आपली रक्षा करणाऱ्या मुंबई पोलिसांनाही होळी साजरी करण्याचा मोह आवरता आला नाही. खाकी वर्दीला ना डाग ना रंगांची उधळण तर सुरेल मैफिलीच्या स्वरुपात बॅन्ड वाजवत मुंबई पोलिसांनी होळी साजरी केली आहे. मुंबई पोलिस बॅन्ड पथकानं 'रंग बरसे भीगे चुनरवाली...' या गाण्यावर बॅन्ड वाजवत सुरेली धूळवड साजरी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

मुंबई पोलिसांनी ड्रम, सॅक्सोफोन, ट्रम्पेट, बासरी अशा अनेक वाद्यांच्या समावेश करत 'रंग बरसे भीगे चुनरवाली...' गाण्याचं बॅन्ड व्हर्जन तयार केले आहे. मुंबई पोलिसांच्या बॅन्डचे खाकी स्टुडिओ नावाचे युट्युब चॅनेल आहे. यावर मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ प्रसारित केला आहे. या आधीही मुंबई पोलिसांच्या बॅन्ड पथकाने लतादीदींच्या ऐ मेरे वतन के लोगो, मनी हाईस्टमधील बेला चाव, मेरे सपनों की राणी, जय हो, जय - जय महाराष्ट्र माझा, जेम्स बॉन्ड थीम अशी अनेक गाणी या बॅन्डच्या स्वरुपात सादर केली आहेत.

बातम्या आणखी आहेत...