आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेक TRP केस:मुंबई पोलिसांनी 1400 पानांचे आरोपपत्र केले सादर, रिपब्लिक टीव्हीच्या अधिकाऱ्यांसह 12 आरोपी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपी चॅनलच्या मालकांना पोलिसांनी फरार आरोपी म्हटले

कथित टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) घोटाळ्याचा तपास करणार्‍या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयात 1400 पानांचे आरोपपत्र सादर केले. रिपब्लिक टीव्हीचे वितरण प्रमुख घनश्याम शर्मा यांच्यासह यात 12 आरोपींची नावे आहेत. आरोपपत्रात ऑडिटर्स आणि फॉरेंसिक एक्सपर्टसह 140 जणांना साक्षीदार बनवण्यात आले आहे. दोन आरोपींनाही सरकारी साक्ष बनवण्यासाठी अर्ज देण्यात आला आहे. पुढील तपासणीनंतर पूरक आरोपपत्र सादर केले जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मागच्या महिन्यात टीआरपी घोटाळा उघडकीस आला तेव्हा रेटिंग एजन्सी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल (बार्क)ने हंसा रिसर्च ग्रुपमार्फत काही दूरचित्रवाणी वाहिन्या रेटिंगच्या डेटामध्ये हेरगिरी करीत असल्याची तक्रार दाखल केली होती.

चॅनलला केवळ TRP च्या आधारावरच जाहिराती मिळतात. मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी गेल्या महिन्यात दावा केला होता की, रिपब्लिक टीव्ही आणि दोन मराठी चॅनल- बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी TRP च्या आकड्यांमध्ये फेरफार करत आहेत. मात्र रिपब्लिक टीव्ही आणि दुसऱ्या चॅनलने हे आरोप फेटाळून लावले होते.

आरोपी चॅनलच्या मालकांना पोलिसांनी फरार आरोपी म्हटले
चार्ज शीटमध्ये पोलिसांनी आरोपींविरोधात कलम 409, 420, 465, 468, 406, 120बी, 201, 204, 212 आणि 34 दाखल केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये रिपब्लिक टीव्हीचे डिस्ट्रीब्यूशन हेड घनश्याम शर्मांचा समावेश आहे. पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही, न्यूज नेशन, फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि वाऊ चॅनलच्या विरोधात पैसे देऊन बनावट TRP मिळवल्याचा आरोप केला आहे. या चॅनलचे संचालक आणि मालकांनाही फरार आरोपी असल्याचे म्हटले आहे.

पोलिसांनी दावा केला आहे की, पकडण्यात आलेले अनेक आरोपी, चॅनलचे अधिकारी आणि ज्या लोकांच्या घरात TRP मीटर लावले आहेत, त्यांच्या संपर्कात होते. आरोपींनी चॅनलकडून पैसे घेऊन तेच चॅनल पाहत असल्याचे कबूल केले आहे. फोन, लॅपटॉप आणि बँक खात्यामधूनही पुरावे मिळाले आहेत.

रिपब्लिक टीव्हीच्या COO ने अर्णबसोबतचे चॅट डिलीट केले
एका अधिकाऱ्याने सांगितले की, रिपब्लिक टीव्हीच्या COO प्रिया मुखर्जी या तपासात सहकार्य करत नाही. चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले तेव्हा त्या आपला मोबाईल घेऊन आल्या नाहीत. तसेच अर्णबसोबत झालेली चॅट त्यांनी डिलीट केली. ही चॅट मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या मुखर्जी यांनी अटक टाळण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे, परंतु पोलिस त्यांना फरार आरोपी म्हणून संबोधत आहेत.

पोलिसांनी मंगळवारी वाऊ चॅनलचे मालक जयंतीलाल गडा आणि त्याचा मुलगा अक्षय यांना चौकशीसाठी बोलावले होते पण ते हजर झाले नाहीत. गडा फिल्म प्रोडक्शन कंपनी पेन इंडिया लिमिटेडचे मालकही आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser