आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई पोलिसांनी जीव धोक्यात घालून चोराला पकडले:राजस्थानमध्ये कारवाई, 25 ते 30 गावकऱ्यांचा होता तीव्र विरोध, 15 लाखांचे चोरी प्रकरण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपला जीव धोक्यात घालून मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी राजस्थानमधून एका चोरट्याला पकडले आहे. महेंद्रकुमार मेघवाल असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत.

पोलिस उपायुक्त (परिमंडळ-11) अजय कुमार बन्सल यांनी सांगितले की, दहिसर (प.) येथील सिगारेट आणि पानाचे घाऊक विक्रेते राकेश तुका शेट्टी यांनी एमएचबी पोलिस स्टेशनमध्ये 15 लाख रुपयांच्या माल चोरीचा एफआयआर दाखल केला होता. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनवरून या प्रकरणामध्ये चोर महेंद्र कुमारचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाले.

चोरीचा गुन्हा केल्यानंतर आरोपी आपल्या पाली (राजस्थान), तखतगड या गावात लपून बसला. मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने आरोपी महेंद्र कुमारला पकडण्याचा प्रयत्न केला असता 25 ते 30 गावकऱ्यांनी तीव्र विरोध प्रदर्शन केला. त्यामुळे मुंबई पोलिस अधिकाऱ्यांचा जीव काही क्षणांसाठी अडचणीत आला होता असे असतानाही मुंबई पोलिसांनी गावकऱ्यांच्या गर्दीतून आरोपीला अटक करून प्रथम राजस्थानमधील स्थानिक पोलिस ठाण्यात आणि नंतर तेथून एमएमएचबी पोलिस ठाण्यात नेले.

पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी माहिती दिली की, अटक आरोपी महेंद्र कुमार विरुद्ध डुंगरी पोलिस स्टेशन (वलसाड, गुजरात), जीआयडीसी पोलिस स्टेशन (वलसाड, गुजरात), नया नगर पोलिस स्टेशन (मिरारोड) आणि दिंडोशी पोलिस स्टेशन (मुंबई) येथे गुन्हे दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...