आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटमोचक सक्रिय होणार:शरद पवारांनीच अध्यक्षपदी रहावे, 16 सदस्यांच्या समितीने राजीनामा फेटाळला; प्रफुल्ल पटेलांची माहिती

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवारांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता या ठरावाची शरद पवारांची भेट घेऊन त्यांना माहिती देणार आहोत. तसेच त्यांना पदावर कायम राहण्याबाबत विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी 15 सदस्यीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करण्यात आली. समिती जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल असे पवार यांनी याआधीच म्हटले आहे.

जराही कल्पना नव्हती

पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल म्हणाले, लोक माझे सांगातीच्या कार्यक्रमात शरद पवारांनी घोषणा केली होती. त्याचवेळी त्यांनी अध्यक्षपद कोणाकडे द्यावे, यासाठी समिती गठित केली होती. मी राष्ट्रीय उपाध्यक्ष असल्याने माझ्याकडे ही जबाबदारी त्यांनी भाषणातून दिली होती. आम्ही हा निर्णय ऐकून स्तब्ध झालो होतो. आम्हाला या निर्णयाची जराही कल्पना नव्हती. आम्ही पवार साहेबांची वारंवार भेट घेत त्यांना याबाबत विनंती करत राहिलो.

कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना

प्रफुल्ल पटेल पुढे बोलताना म्हणाले, शरद पवार हे देशाचे सन्मानित नेता आहेत. त्यांचा व्याप मोठा. राज्यासह देशाला त्यांची गरज आहे. पंजाबमधील शेतकरी देखील पवार साहेबांचे नाव घेतात. पवार साहेबांच्या या निर्णयाचे पडसाद गावागावात उमटले. कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना बघायला मिळाल्या. त्यांच्या मनात वेदना, दुःख, नाराजी. याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आम्हाला विश्वासात न घेता निर्णय जाहीर केला गेला.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही आजच्या बैठकीत ठराव सर्वानुमते पारित केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला राजीनामा एकमताने मंजूर करण्यात येत आहे. आता आमच्या भावना घेऊन शरद पवारांना भेटणार आहोत. प्रत्यक्ष भेटून शरद पवारांना विनंती करणार आहोत. सर्वांची भावना हीच की त्यांनी पक्षाध्याक्ष पदी कायम राहावे. आमच्या भावनांचा विचार करुन त्यांनी निर्णय मागे घ्यावा. आम्ही पवार साहेबांना भेटून विनंती करणार आहोत.

संबंधित वृत्तः

​​​​​पुढचे पाऊल:पवार दूर करणार समर्थकांची नाराजी; दादांची मात्र वाढणार, नाराज ठाकरेंचे पवारांनाही टोमणे​​

राजकारण:भाजपविरुद्ध लढण्यासाठी कुणाला जबरदस्ती सोबत न्यायचे नाही, राष्ट्रवादीतील वादळानंतर नाना पटोले यांची स्पष्ट भूमिका