आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Mumbai Pune Corona Cases 2 April | Maharashtra Coronavirus District Wise Updates; Mumbai Thane Pune Nashik Solapur Aurangabad Nagpur Latest News

कोरोनाचा सर्वात मोठा स्फोट:मुख्यमंत्र्यांनी बोलावली आपत्कालीन बैठक, रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्र जगात चौथ्या क्रमांकावर; मुंबईमध्ये आजपासून कठोर निर्बंधांची शक्यता

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • महाराष्ट्रात फेब्रुवारीपासून 400 टक्के रुग्ण जास्त आढळले

कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा स्फोट महाराष्ट्रात झाला आहे. गेल्या 24 तासांत 43,183 नवीन रुग्ण समोर आले आहेत. कोणत्याही राज्यात कोरोनाची सापडलेली ही सर्वात जास्त प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील देशांमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

महाराष्ट्रात फेब्रुवारीपासून 400 टक्के रुग्ण जास्त आढळले
गुरुवारी देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 8,646 प्रकरणे आढळली. मार्च महिन्यात मुंबईमध्ये कोरोनाचे 88,710 नवीन प्रकरणे समोर आली. जे फेब्रुवारीच्या तुलनेत 475 % जास्त आहे. या दरम्यान 216 लोकांचा जीव गेला जो फेब्रुवारीच्या तुलनेत 181% जास्त आहे. तर संपूर्ण राज्यात 6.6 लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्णांची प्रकरणे समोर आली जी फेब्रुवारीच्या तुलनेत 400% जास्त आहेत.

महाराष्ट्रातील सात दिवसांतील रुग्ण

तारीखपॉझिटिव्ह रुग्ण
26 मार्च36902
27 मार्च35726
28 मार्च40414
29 मार्च31643
30 मार्च27918
31 मार्च39544
1 एप्रिल43,183

राज्याती या राज्यांमध्ये लॉकडाऊन

 • मुंबई: ज्या सोसायटीमध्ये पाचपेक्षा जास्त रुग्ण आहेत, त्या सोसायटी सील केल्या आहेत.
 • बीड: 26 ते 4 मार्चपर्यंत लॉकडाऊन.
 • नांदेड: 25 ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन.
 • नंदुरबार: 31 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन.

मुंबईमध्ये आजपासून कठोर निर्बंधांची शक्यता
वाढत्या कोरोना प्रकरणांमध्ये मुंबईला आजपासून आणखी कठोर निर्बंधांचा सामना करावा लागू शकतो. एक दिवस दुकाने बंद आणि एक दिवस उघडण्याचा निर्णय घेता येईल, असे त्यांनी म्हटले आहे. यासह विवाहसोहळ्यांमध्ये पाहुण्यांची संख्या 50 पर्यंत मर्यादित ठेवावी. तसेच अंत्यसंस्कारास येणार्‍या लोकांची संख्या देखील 20 पर्यंत मर्यादित ठेवावी.

मुख्यमंत्री मुंबईत आणि उपमुख्यमंत्री पुण्यात घेत आहेत बैठक
कोरोनाच्या या भीषण आकडेवारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी पाच वाजता 'वर्षा' बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जाईल. कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध घालण्याबाबत निर्णयदेखील घेतले जाऊ शकतात. त्याचवेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन घेण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

पुण्यातील कोरोना रुग्णाचा मृतदेह आता कुटुंबीयांना घ्यावा लागणार आहे
पुणे महानगरपालिकेने नवा नियम जारी केला आहे की कोरोना रुग्णाच्या निधनानंतर मृतदेह नातेवाईकांनाच सांभाळावा लागेल. घरात रुग्णाचा मृत्यू झाल्यास, मृतदेह प्रशासनाकडे देण्याची संपूर्ण प्रक्रिया स्वतःच पूर्ण करावी लागेल. यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांच्या वतीने बॉडी बॅग आणि चार पीपीई किट नातेवाईकांना देण्यात येणार आहेत. नातेवाईकांनी ते किट घालावे आणि बॉडी बॅगमध्ये टाकावी लागेल आणि नंतर मृतदेह गाडीत ठेवावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...