आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन दिवस वीकेंड लॉकडाऊन असूनही राज्यात संक्रमितांची संख्या कमी झालेली नाही. याउलट कोरोना रुग्णांनी एक नवा विक्रम बनवला आहे. देशातील कोणत्याही राज्यांपेक्षा हा सर्वात मोठा आकडा आहे. रविवारी 63 हजार 294 नवीन केस समोर आले. दरम्यान 349 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. worldometers नुसार नवीन रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. महाराष्ट्राने अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझीलला मागे टाकले आहे.
राज्यात मृत्यू दर 1.7 टक्के आहे. एकूण अॅक्टिव्ह रुग्ण आता 5 लाख 65 हजार 587 झाले आहेत. मुंबईत गेल्या 20 दिवसांमध्ये 1,54,300 लोक संक्रमित झाले आहेत. रोज सरासरी 7,715 लोक कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. येथे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 67,092 झाली आहे.
प्रभावित लोकांना आर्थिक पॅकेज देण्यासाठी आज महत्त्वाची बैठक
लॉकडाऊनमुळे प्रभावित होणाऱ्या वर्गासाठी आर्थिक पॅकेज ठरवण्याविषयी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्रिमंडळाच्या इतर सदस्यांसोबत बैठक करतील. यामध्ये संपूर्ण लॉकडाऊनविषयीही सहमती होऊ शकते. यापूर्वी रविवारी विरोधीपक्ष नेते फडणवीस म्हणाले होते की, जनता आणि व्यापाऱ्यांच्या हिताकडे लक्ष द्यायला हवे.
मुंबईमध्ये पुन्हा सुरू झाली मद्याची होम डिलीवरी
दरम्यान BMC ने महानगरात सकाळी सात वाजेपासून रात्रई आठ वाजेपर्यंत मद्याच्या होम डिलिवरीस परवानगी दिली आहे. होम डिलिवरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचावाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागेल आणिसर्व RT-PCR किंवा रॅपिड अँटिजन टेस्ट प्रत्येक 15 दिवसाला अनिवार्य असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.