आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सहा वाहनांचा विचित्र अपघात, चौघे जागीच ठार; ट्रक आणि टेम्पोच्या मध्यभागी असणाऱ्या कारचा चुराडा

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एम. जी. एम. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.

आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यावेळी मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली. यामध्ये ट्रक आणि टेम्पोच्या मध्ये आल्याने कारचा चुराडा झाला आहे. या भीषण अपघातामध्ये दोन मोठ्या वाहनांच्यादरम्यान चिरडल्या गेलेल्या कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण हे गंभीर जखमी आहेत.

घटनेची माहिती मिळताच येथे महाराष्ट्र सुरक्षा दल ,देवदूत रेस्क्यू टीम आणि खोपोली, खंडाळा, महामार्ग पोलिस दाखल झाले. जखमींना पनवेलमधील एम जी एम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...