आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शनिवारी सकाळी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. या दोन्ही अपघातात दोन जण इतर लोक जखमी झाले आहेत. पहाटे सहाच्या सुमारास अमृतंजन पुलाजवळ पहिली घटना घडली. येथे भरधाव वेगातील ट्रक अनियंत्रित होऊन उलटला आणि याखाली दबल्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर एक्सप्रेस वेवर दोन तास ट्रॅफिक जाम होते.
साखरेच्या पोत्याखाली दबल्यामुळे झाला व्यक्तीचा मृत्यू
मृताची ओळख कुमार तेली नावाने झाली आहे. यामध्ये राहुल नावाचा व्यक्ती जखमी झाला आहे. हे दोघे ज्या ट्रकने जात होते त्यामध्ये साखर होती. ट्रक उलटल्यानंतर अनेक पोते या दोघांच्या अंगावर पडले, यामुळे कुमारचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलिस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि राहुल यांना लोणावळा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. खंडाळा पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक रस्त्यातून हटवली यानंतर तीन तासांनंतर हायवे पूर्णपणे क्लिअर झाले.
दोन ट्रेलरच्या धडकेत एकाचा मृत्यू
दुसरा अपघात खालापूरच्या फूड मॉलजवळ झाली. येथे एका ट्रेलरने मागून दूसऱ्या ट्रेलरला धडक दिली. ज्यामुळे एक ट्रेलरमध्ये असणाऱ्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्याजवळ बसलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. त्याच्यावर खंडाळाच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान रस्त्याच्या कडेला अपघात झाल्याने वाहतुकीला अडथळा आला नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.