आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Pune (Maharashtra) Coronavirus Cases 01 MAY Update | Maharashtra Corona Cases District Wise Today News; Mumbai Pune Thane Nashik Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील आकडे इतर देशांपेक्षा अधिक:18+ नागरिकांचे प्रतिकात्मक लसीकरण आजपासून, मुंबईत आज केवळ 5 सेंटर्सवर 1 हजार लोकांचे होणार लसीकरण

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजपासून प्रतीकात्मकरित्या लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी कोविड-19 चे 62,919 प्रकरणे समोर आले आणि 828 लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला. राज्य असतानाही नवीन रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र इतर देशांना पिछाडीवर टाकत आहे. नवीन प्रकरणांमध्ये महाराष्ट्र जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण केवळ ब्राझीलमध्ये (73,076 नवीन रुग्ण) सापडले आहेत. यासोबतच शुक्रवारी एकूण संक्रमितांची संख्या 46,02,472 झाली आहे. एकूण रुग्णांच्या आकड्यांत सुद्धा महाराष्ट्र जगात 6 व्या क्रमांकावर आला आहे. तर एकूण मृतांची एकूण संख्या 68,813 झाली आहे.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजपासून प्रतिकात्मकरित्या लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली आहे. यानुसार राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये 18 ते 44 वर्षांच्या 3.5 लाख लोकांचे लसीकरण केले जाईल. यापूर्वी शुक्रवारी राज्यांच्या जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, मेमध्ये 18 लाख डोस मिळतील, तर राज्यांना 12 कोटी डोसची आवश्यकता आहे.

आज मुंबईत केवळ 1 हजार लोकांना लस देण्यात आली आहे
मुंबईतील अवघ्या 5 केंद्रांवर 1 हजार लोकांना लसी देण्यात येणार आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार या केंद्रांमध्ये नायर हॉस्पिटल, बीकेसी जंबो फॅसिलिटी, कूपर हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि राजावाडी हॉस्पिटलचा समावेश आहे. त्याचबरोबर पुण्यातही प्रशासनाने आज एवढ्याच लोकांना लसी देण्याची तयारी दर्शवली आहे.

या महिन्यात महाराष्ट्राला केवळ 18 लाख लस मिळणार आहेत
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, सीरम संस्थेने मे महिन्यात सुमारे 13 ते 15 लाख कोविशील्ड लस महाराष्ट्रात देण्यास सहमती दर्शवली आहे. तर भारत बायोटेकने सुमारे 4 लाख 'कोव्हॅक्सिन' लस देण्याचे म्हटले आहे. दोन्ही कंपन्या जवळपास 18 लाख कोरोना लस देऊ शकतात. राज्यात लस उपलब्ध झाल्यानंतर संपूर्ण क्षमतेने लसीकरण सुरू केले जाऊ शकते. टोपे म्हणाले की, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लस देण्यासाठी राज्यात 4 हजार 200 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यात शासकीय व्यतिरिक्त खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...