आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Pune (Maharashtra) Coronavirus Cases 11th May Update | Maharashtra Corona Cases District Wise Today News; Mumbai Pune Thane Nashik Aurangabad

महाराष्ट्रात थोडा दिलासा:राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; म्यूकोरमायकोसिसवर राज्यातील 1000 रुग्णालयांमध्ये मोफत होणार उपचार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात नवीन रुग्णापेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा जवळपास दुप्पट

राज्यात कोरोना संक्रमणाच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या 24 तासांमध्ये 37 हजार 236 नवीन प्रकरणे समोर आली. तर 61 हजार 607 रुगण बरेही झाले. हा आकडा 31 मार्चला आलेल्या 39 हजार 544 च्या जवळपास आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 86.97% झाला आहे. राज्यात आतापर्यंत 44 लाख 59 हजार 425 रुग्ण कोरोना संक्रमणानंतर बरे झाले आहेत. तर दरम्यान 594 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 74 मृत्यू मुंबईमध्ये झाले. सध्या 36.70 लाख लोक होम क्वारंटाइन आहेत आणि 26,664 रुग्ण इंस्टिट्यूशनल क्वारंटाइन आहेत. राज्यात 7 लाखापर्यंत पोहोचलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होऊन 6 लाखांपेक्षा कमी झाली आहे.

आकड्यांमध्ये दिलासा असला तरीही राज्यात पुन्हा 15 दिवस म्हणजेच 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवले जाऊ शकते. सूत्रांनुसार, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्याच्या 11 शहरांमध्ये हार्ड लॉकडाऊन सुरू आहे. येथे दूध, किराणा आणि भाजीच्या दुकाना वगळता सर्व काही बंद आहे. या शहरांमध्ये ऑनलाइन फूड आणि इतर आवश्यक वस्तूंची डिलीवरी सुरू आहे.

मुंबईमध्ये संक्रमितांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण झाले बरे
मुंबईमध्येही कोरोनाचा प्रभाव सलग कमी होत आहे. सोमवारी येथे 1,794 नवीन प्रकरणे समोर आली. मात्र याच्या दुप्पट म्हणजेच 3,580 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले. येथे रविवारी 2,403 केस नोंदवण्यात आल्या होत्या, तर 3,375 रुग्ण बरे झाले होते.

राज्यात मोफत होणार म्यूकोरमाइकोसिसवर उपचार
पुणे, मुंबईच्या शहरी भागांमध्ये रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र ग्रामिण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी म्हटले की, म्यूकोरमाइकोसिसच्या रुग्णांवरील उपचार राज्य सरकारच्या प्रमुख वैद्यकीय विमा योजनानुसार राज्याच्या 1 हजार हॉस्पिटलमध्ये मोफत केला जाईल. म्यूकोरमाइकोसिस एक दुर्मिळ कवक (फंगल) इन्फेक्शन असते. जे आता कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या व्यक्तींमध्ये समोर येत आहे.

मुंबईमध्ये विदेशातून येणार कोरोना व्हॅक्सीन
व्हॅक्सीनच्या कमतरतेचा सामना करत असलेल्या BMC ने व्हॅक्सीन खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, BMC कमिश्नर आयएस चहल यांनी BMC मध्ये गटनेत्यांच्या बैठकीत ही माहिती दिली. चहल यांनी म्हटले आहे की, पुढच्या दोन दिवसांत टेंडर काढून मुंबईच्या लोकांना लवकरात लवकर व्हॅक्सीन उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...