आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Pune (Maharashtra) Coronavirus Cases 20 April Update | Maharashtra Corona Cases Deaths District Wise Today News; Mumbai Pune Thane Nashik Aurangabad Solapur Amravati

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरण थांबले:मुंबईमध्ये NO व्हॅक्सीन, पुढच्या तीन दिवसांपर्यंत व्हॅक्सीनेशन बंद; लक्षण नसणाऱ्या रुग्णांसाठी नवीन गाइडलाइन्स केल्या जारी

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गोरगाव येथील नेस्को लसीकरण केंद्रावर अचानक भेट दिली. केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. - Divya Marathi
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गोरगाव येथील नेस्को लसीकरण केंद्रावर अचानक भेट दिली. केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसल्या.
  • राज्यात मृतांचा आकडा वाढून 67 हजार 985 झाला आहे.

राज्यात 15 मे म्हणजेच पुन्हा 15 दिवसांचे लॉकडाऊन वाढले आहे. तरीही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. राज्यात गुरुवारी 66 हजार 159 नवीन प्रकरणे समोर आली आहेत आणि 771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात 68 हजार 537 रुग्ण बरे होऊन घरीही आले आहेत. राज्यात एकूण संक्रमितांची संख्या वाढून 45 लाख 39 हजार 553 झाली आहे. नवीन केसच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापेक्षा जास्त 69 हजार 079 रुग्ण केवळ ब्राझीलमध्ये आढळले आहेत. एकूण रुग्णांच्या प्रकरणात हे जगातील 215 देशांपेक्षा पुढे आहे. राज्यात मृतांचा आकडा वाढून 67 हजार 985 झाला आहे.

मुंबईमध्ये पुढच्या तीन दिवस होणार नाही व्हॅक्सीनेशन
राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली आहे. असे असताना व्हॅक्सीनच्या कमतरतेमुळे तीन दिवस कोरोना लसीकरण केले जाऊ शकणार नाही. येथे 2 मेपर्यंत लसीकरण मोहिम थांबवण्यात आली आहे. बुधवारी रात्री BMC कमिश्नर आयएस चहल म्हणाले, 'आम्हाला कोवीशील्ड व्हॅक्सीनचा डोस मिळाला आहे. गुरुवारी BMC आणि सरकारी सेंटर्सवर लस दिली जाईल.' मात्र गुरुवारी संध्याकाळपर्यंत या दाव्याची हवा निघाली. BMC ने गुरुवारी संध्याकाळी घोषणा केली की, 'लसीच्या कमतरतेमुळे पुढच्या तीन दिवसांपर्यंत मुंबईमध्ये व्हॅक्सीनेशन करणार नाही.' तत्पूर्वी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गोरगाव येथील नेस्को लसीकरण केंद्रावर अचानक भेट दिली. केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसल्या.

लक्षण नसणाऱ्या रुग्णांसाठी नवीन गाइडलाइन्स जारी केल्या

  • घरीच रेमडेसिवियर इंजेक्शन न घेण्याचा सल्ला दिला आहे. हे इंजेक्शन केवळ हॉस्पिटलमध्ये दिले गेले पाहिजे, यामुळे हे घरात स्टोर करु नका.
  • जर सौम्य लक्षण असतील, तर स्टेरॉयडचा वापर करु नका.
  • जर सात दिवस सलग लक्षण असतील म्हणजेच खोकला, ताप असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यावर कमी डोसचे स्टेरॉयड घेतले जाऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...