आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Mumbai Pune (Maharashtra) Coronavirus Cases Latest Update | Maharashtra Corona Outbreak Cases District Wise Today News; Mumbai Pune Ahmednagar Nashik Nagpur

तिसऱ्या लाटेशी लढण्याची तयारी:महाराष्ट्रात 86.4% कोरोना रुग्ण बरे झाले, तिसऱ्या लाटेशी दोन हात करण्यासाठी 1000 फॅमिली डॉक्टरांची टीम तयार करत आहे राज्य सरकार

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

राज्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 48,401 नवीन रुग्ण सापडेल. तर विशेष म्हणजे, 60,226 रुग्ण बरे होऊन घरी पोहोचले आहेत. याच दरम्यान 572 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. राज्यात सद्यस्थितीला एकूण 6 लाख 15 हजार 783 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात 2.94 कोटी लोकांची चाचणी झाली. त्यापैकी 44.07 लाख संक्रमित निघाले. सर्वात महत्वाचे म्हणजे, राज्यात कोरोना संक्रमित झालेल्यांमध्ये बरे होण्याचे प्रमाण आता 86.4% झाले असून मृतांचा आकडा 1.49% टक्के आहे.

केवळ मुंबईत दिवसभरात 2395 नवे रुग्ण सापडले आहेत. या ठिकाणी 13,868 रुग्ण बरे झाले तर 68 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत 6.76 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. तर 13,781 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. सध्या मुंबईत 51,165 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

एक हजार फॅमिली डॉक्टरांना ट्रेनिंग देत आहे सरकार
कोरोना संक्रमणाची दुसरी लाट संपायला आली असून महाराष्ट्र सरकारने तिसऱ्या लाटेशी दोन हात करण्याची तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी एक हजार खासगी फॅमिली डॉक्टरांशी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. कोरोनात लोक घाबरून वेळीच रुग्णालयात दाखल होतात. अशात फॅमिली डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा राहिला आहे. सुरुवातीपासूनच फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याला अन्यसाधारण महत्व आहे. यासोबतच, कोरोना काळ फॅमिली डॉक्टरांसाठी सुद्धा आव्हानाचा काळ आहे.

तिसऱ्या लाटेत चिमुकल्यांना धोका
मुख्यमंत्र्यांनी या चर्चेत फॅमिली डॉक्टरांशी चर्चा करून त्यांचे सल्ले ऐकून घेतले. यानंतर त्यांची अंमलबजावणी केली जाणार असे आश्वासनही दिले. मुख्यमंत्र्यांनी अशाच प्रकारे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्टरांशी संवाद साधावा असेही आवाहन यातून करण्यात आले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वात जास्त धोका आहे. अशात बालरोग तज्ज्ञ आणि फॅमिली डॉक्टरांचे सल्ले घेतले जात आहेत. सरकारने लहान मुलांसाठी वेगळे रुग्णालये, आयसीयू वार्ड आणि व्हेंटिलेटर सुद्धा तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

बालरोग तज्ज्ञांनी सतर्क राहावे

टास्क फोर्सकडून या डॉक्टरांना सांगण्यात आले आहे, की लहान मुलांच्या आरोग्य तपासणी करत असताना सतर्क राहा. लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला आणि अपचनाच्या समस्यांसह दूध न पिण्यावर सुद्धा बारकाईने लक्ष ठेवावे. ही कोरोनाची लक्षणे असू शकतात.

टास्क फोर्सने फॅमिली डॉक्टरांचे या मुद्द्यांवर केले मार्गदर्शन

 • स्टेरॉइड कधी आणि किती प्रमाणात द्यावे?
 • 6 मिनिटे वॉक करण्याचा नेमके महत्व काय?
 • रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे हे कसे ओळखावे?
 • कोरोनानंतर होणाऱ्या फंगल इंफेक्शन, म्यूकर मायकॉसिस रोगावर कसे उपचार करावे?
 • रेमडेसिवीर इंजेक्शनचे प्रमाण किती असावे?
 • व्हेंटिलेटरच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी?
 • कोरोना बरे झाल्यानंतर किती दिवस रुग्णावर नजर ठेवावी?
बातम्या आणखी आहेत...