आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Pune (Maharashtra) Coronavirus Cases Unlock Update | Maharashtra Corona Cases Deaths District Wise Today News; Mumbai Pune Thane Nashik Aurangabad Bhandara Ahmednagar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना रिटर्न्स:कोरोना रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्र जगात तिसऱ्या क्रमांकावर, पहिल्यावर अमेरिका तर दुसऱ्यावर ब्राझील; मुंबईत आजपासून मॉलमध्ये अँटीजन टेस्टची सुरुवात

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धारावीमध्ये आजपासून 1000 लोकांना दिली जाणार लस

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये येथे 30 हजार 535 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. हे महामारी सुरू झाल्यानंतर आतापर्यंत सर्वाधिक प्रकरणे आहेत. दरम्यान राज्यात 99 लोकांचा व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या भयावहतेचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो की, एका दिवसात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्र जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रापेक्षा जास्त केवळ अमेरिका आणि ब्राझीलमध्ये क्रमशः 39,496 आणि 47,774 प्रकरणे मिळाली आहेत.

राज्यात 90% रिकव्हरी रेट
यासोबतच राज्यात एकूण संक्रमित 24 लाख 79 हजार 682 झाले आहेत. येथे मृतांची संख्या वाढून 53 हजार 399 झाली आहे. शनिवारी महाराष्ट्रात 27 हजार 126 हजार 126 केस आल्या होत्या आणि 92 लोकांचा मृत्यू झाला होता. या दरम्यान 11,314 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ज्यानंतर राज्यात एकूण 22,14,867 रुग्ण बरे होऊन घरीही गेले आहेत आणि रिकव्हरी रेट 90.79% आहे.

मुंबईमध्ये आजपासून अँटीजन टेस्टची सुरुवात
कोरोनाची वाढते प्रकरणे पाहून मुंबईमध्ये आजपासून अँटिजन टेस्ट करण्यास सुरुवात झाली आहे. बस स्टॉप, रेल्वे स्टेशन आणि मॉलमध्ये ही टेस्ट आजपासून केली जाईल.

धारावीमध्ये आजपासून 1000 लोकांना दिली जाणार लस
कोरोनाचा वाढता धोका पाहता आजपासून आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीमध्ये विशेष लसीकरण अभियान सुरू होत आहे. यानुसार 1000 लोकांना रोज कोरोना व्हॅक्सीन दिली जाईल. सुरुवातीला ही व्हॅक्सीन 45 पेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाणार आहे. यानुसार अडीच लाख लोकांना लसीकरणाचे लक्ष्य बनवले आहे. धारावीमध्ये फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये जवळपास 62 टक्के रुग्ण वाढल्यानंतर प्रशासनाची चिंता वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...