आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Mumbai Pune (Maharashtra) Coronavirus Cases Update Live | Maharashtra Cronavirus Lockdown Latest News Kota Thane Nashik Akola Jalgaon Kolhapur

राज्यात कोरोनाचा डाउनफॉल सुरू:मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 2 हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले, तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी BMC ने जारी केल्या लसीकरणासाठी मार्गदर्शक सूचना

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • गेल्या 24 तासांमध्ये येथे 1,717 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 40,956 नवीन संक्रमित आढळले. 71,969 रुग्ण बरे झाले आणि 793 जणांचा मृत्यू झाला. आता एकूण 5 लाख 58 हजार 996 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत 2.98 कोटी सँपलची चाचणी करण्यात आली आहे. यामधून 51.79 लाख लोक संक्रमित आढळले आहेत.

केवळ मुंबईविषयी बोलायचे झाले तर गेल्या 24 तासांमध्ये येथे 1,717 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. 6082 रुग्ण बरे झाले आहेत आणि 51 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे आतापर्यंत 6.79 लाख लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. तर 14 हजार लोकांनी जीव गमावला आहे. सध्या येथे 40,162 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईसह राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांच्या आकड्यांवर नजर टाकल्यास समजते की, कोरोनाचे डाउनफॉल सुरू झाला आहे. विशेषतः मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 2000 च्या आत आणि राज्यात 40 हजारांच्या जवळपास रुग्ण आढळले आहेत. सोमवारी राज्यात 1,92,330 आणि मुंबईमध्ये 23,061 लोकांची तपासणी करण्यात आली होती. ज्यामधून 37,236 आणि मुंबईमध्ये 1,794 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. टेस्टिंगमध्ये वाढ होऊनही मुंबईमध्ये रुग्ण कमी झालेले आहेत. तर राज्यात नवीन प्रकरणांमध्ये थोडी वाढ पहायला मिळाली आहे. संक्रमितांची संख्या दिलासा देणारी असली तरीही मृतांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळालेले नाही.

31 मेपर्यंत लॉकडाऊनवर आज होऊ शकतो निर्णय
राज्यात कलम 144 आणि लॉकडाऊनचे निर्बंध 31 मेपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इशारा केला आहे की, रुग्णांची संख्या राज्यात 50,000 ते 60,000 दरम्यान आल्यामुळे सरकार लॉकडाऊनवरील निर्बंध आणि कलम 144 हे 31 मेपर्यंत वाढवू शकते. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नाशिक, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर आणि यवतमाळमध्ये कठोर लॉकडाऊन असूनही रुग्णांची संख्या सलग वाढत आहे. यामुळे काही मंत्री आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पुढच्या 15 दिवसांसाठी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करणे योग्य राहील.

BMC च्या व्हॅक्सीनेशनविषयी नवीन गाइडलाइन्स

 • तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी BMC आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी लसीकरणाविषयी हाउसिंग सोसायटी आणि प्रायव्हेट वर्क स्पेससाठी गाइडलाइन जारी केल्या आहेत.
 • रजिस्टर्ड प्रायव्हेट कोविड व्हॅक्सीनेशन सेंटरच्या माध्यमातून हाउसिंग सोसायटी आणि प्रायव्हेट वर्कप्लेसवर 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व पात्र लोकांसाठी व्हॅक्सीनेशनचे आयोजन केले जाऊ शकते.
 • यासाठी प्रायव्हेट वर्कस्पेस आणि हाउसिंग सोसायटीच्या मॅनेजमेंटला आपल्या एका सीनियर स्टाफला मॅनेजमेंटसाठी नोडल ऑफिसर नियुक्त करावे लागेल.
 • अशा लसीकरण केंद्रांवर खासगी कामाच्या ठिकाणी असलेले कर्मचारी, त्यांचे कुटुंबातील सदस्य, गृहनिर्माण संस्थेचे रहिवासी, मोलकरीन, ड्रायव्हरसह 18 आणि त्यापेक्षा जास्त वयाचे लसीसाठी पात्र असतील.
 • यासाठी प्रत्येकाला कोविन पोर्टलवर जाऊन पहिलेच नोंदणी करावी लागेल. कामाची जागा असल्यास कर्मचार्‍यांना ऑन-द-स्पॉट नोंदणी करण्याची सुविधा असेल.
 • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की, रजिस्टर्ड प्रायव्हेट कोविड व्हॅक्सीनेशन सेंटरला किती पैसे द्यावे लागतील? हे खासगी कार्यालय आणि हाउसिंग सोसायटीचे मॅनेजमेंट आणि प्रायव्हेट व्हॅक्सीनेशन सेंटरला आपसात बोलून पहिले ठरवून घ्यावे लागेल.

लोकल ट्रेन, मोनो रेलवरील निर्बंध कायम
महाराष्ट्र सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, कोविड -19 मधील प्रकरणे सतत वाढत असल्याने मुंबईतील लोकल ट्रेन मेट्रो आणि मोनोरेलच्या कामगिरीवरील बंदी कायम राहील. राज्य सरकारतर्फे बाजू मांडताना अ‍ॅडव्होकेट पीपी काकडे यांनी न्यायमूर्ती केके तातेड आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाला सांगितले की सध्या फक्त फ्रंटलाइन कर्मचारी आणि राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना उपनगरीय रेल्वे सेवा, मोनोरेल आणि मेट्रो ट्रेन वापरण्याची परवानगी आहे.

बातम्या आणखी आहेत...