आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रासाठी चांगली बातमी:मुंबईसह औरंगाबादेतही कमी होत आहेत कोरोना रुग्ण; 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण; सक्र‍िय रुग्णांचा आकडा 7 लाखांच्यावर

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील 18 ते 45 वयोगटातील प्रत्येकाला मोफत लस दिली जाणार

महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात 66 हजार 191 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, राज्यात 61 हजार 450 लोक बरे झाले असून 832 लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दुसरीकडे मुंबईतील नवीन रुग्णांचा आकडा सातत्याने कमी होताना दिसत आहे. दुसरी चांगली बातमी ही की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे.

राज्यात आतापर्यंत 42 लाख 95 हजार 027 लोक कोरोना महामारीच्या विळ्याख्यात आले असून यातील 35 लाख 30 हजार 060 लोक बरे झाले आहे. दरम्यान, कोरोनामुळे आतापर्यंत 64 हजार 760 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्याच्या घडीला 6 लाख 98 हजार 354 सक्र‍िय रुग्ण आहे. सक्र‍िय रुग्णांच्याबाबतीत महाराष्ट्र राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अनुक्रमे अमेरिका, ब्राझील, आणि फ्रान्स देशांचा समावेश होतो.

महाराष्ट्रापेक्षा या देशात सर्वात जास्त सक्र‍िय रुग्ण

देशसक्रिय रुग्ण
अमेरिका6,858,406
ब्राझील1,140,693
भारत2,814,544
फ्रान्‍स1,031,943

मुंबईत सात्यताने कमी होत आहे संक्रमित रुग्ण
राज्याची राजधानी मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने कमी होताना दिसत आहे. यापूर्वी 18 एप्रिल रोजी मुंबई 8 हजार 400 नवीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर 25 एप्रिलपर्यंत सातत्याने कमी होत रुग्ण संख्या 5 हजार 542 वर येऊन पोहचली होती.

बीएमसी कमिश्नर आय.एस. चहल यांच्या मते, मुंबईतील 87 टक्के रुग्णांना कोणतेही लक्षणे नाहीयेत. मुंबईत 18 एप्रिलला कोरोनाचा विकास दर 1.53 % होता, तो आता 1.17% वर आला आहे. मुंबईतील सर्व 24 प्रभागांमधील विकास दर 2% पेक्षा कमी आहे. यासोबतच 8 प्रभागांमधील विकास दर 1% पेक्षा खाली आहे.

कोविड रूग्णाचे नातेवाईक खासगी ऑक्सिजन केंद्रात सिलेंडर घेण्यासाठी आले
कोविड रूग्णाचे नातेवाईक खासगी ऑक्सिजन केंद्रात सिलेंडर घेण्यासाठी आले

राज्यातील 18 ते 45 वयोगटातील प्रत्येकाला मोफत लस दिली जाणार
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना ही महत्त्वाची घोषणा केली आहे. 'महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील 18 ते 45 वयोगटातील प्रत्येकाला मोफत लस दिली जाणार आहे. सरकार आपल्या तिजोरीमधून हा कार्यक्रम हातात घेणार आहे. जागतिक टेंडर मागवण्यात येईल आणि जास्तीत जास्त लस खरेदी केल्या जातील. कॅबिनेट बैठकीमध्ये याविषयी चर्चा झाली आणि एकमत झाल्यानंतर राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला होकार दिला आहे. मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार आहे' असेही नवाब मलिक म्हणाले.

लॉकडाऊन दरम्यान वैद्यकीय उपकरणांची निर्मिती मुंबईत सातत्याने सुरू आहे. अशाच एका कारखान्यात काही फॅक्टरी कामगार पीपीई किट बनवतात
लॉकडाऊन दरम्यान वैद्यकीय उपकरणांची निर्मिती मुंबईत सातत्याने सुरू आहे. अशाच एका कारखान्यात काही फॅक्टरी कामगार पीपीई किट बनवतात

औरंगाबादेत 15 दिवसांत रुग्ण निम्म्याने घटले
गेल्या दोन आठवड्यांपासून शहरातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू घटत आहे, मात्र त्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. 11 एप्रिल रोजी 1,087 पॉझिटिव्ह रुग्ण फक्त शहरी भागात सापडले होते, आता 15 दिवसांनी मनपा हद्दीतील रुग्णांचा हा आकडा निम्म्याने घटला आहे.

लसीकरण, लॉकडाऊनमुळे रुग्ण कमी
वेगाने सुरू असलेले लसीकरण व लाॅकडाऊनमुळे शहरातील रुग्णसंख्या घटल्याचा दावा मनपाचे प्रशासक अास्तिककुमार पांडेय यांनी केला. पुढील दोन महिन्यांत ही संख्या अाणखी कमी हाेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...