आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रासह संपूर्ण देश आज मकर संक्राती आणि पोंगलचा सण साजरा करत आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात जवळपास 10 महिन्यानंतर हा पहिला सण आला आहे, ज्यामध्ये डेथ रेट सर्वात कमी म्हणजेच 2.5 आहे. यापेक्षा कमी मृत्यू दर दिवाळी, भाऊबीज आणि क्रिसमसला होता. या दरम्यान हा आकडा 2.6 टक्के होता. दरम्यान सर्वात जास्त मृत्यू आषाढी एकादशी दरम्यान झाली होते. त्या वेळी कोरोना संक्रमितांचा मृत्यू दर 4.7 टक्के होता. या हिशोबाने मकर संक्रांती महाराष्ट्रातील लोकांसाठी आनंदाचा उत्सव ठरला आहे.
10 महिन्यात 83.6 टक्के वाढला रिकव्हरी रेट
22 मार्चला सुरू झालेल्या लॉकडाऊननंतर गेल्या 10 महिन्यांनध्ये महाराष्ट्रात गुडी पाडवा, आषाढी एकादशी, कृष्ण जन्माष्टमी, पोळा, गणेश चतुर्थी, दिवाळी आणि भाऊ बीजसारखे सण आले. दरम्यान मार्चच्या तुलनेत राज्यात सलग रिकव्हरी रेट सुधारत आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजेच 25 मार्च 2020 ला राज्यात रिकव्हरी रेट 11.4 टक्के होता. जो 14 जानेवारी 2021 ला वाढून 94.8 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
सण | तारीख | एकूण प्रकरणे | एकूण मृत्यू | रिकव्हरी रेट | डेथ रेट |
गुढी पाडवा | 25 मार्च 2020 | 107 | 04 | 11.2 | 3.7 |
वट पोर्णिमा | 05 जून 2020 | 80,229 | 2849 | 43.8 | 3.6 |
अषाढ़ी एकादशी | 1 जुलै 2020 | 1,80,298 | 8053 | 51.7 | 4.5 |
नाग पंचमी | 25 जुलै 2020 | 3,66,368 | 13,389 | 56.6 | 3.7 |
नारळी पोर्णिमा | 3 ऑगस्ट 2020 | 4,50,196 | 15,842 | 63.8 | 3.5 |
कृष्ण जन्माष्टमी | 11 ऑगस्ट 2020 | 5,35,601 | 18,306 | 68.8 | 3.4 |
स्वातंत्र्य दिन | 15 ऑगस्ट 2020 | 5,84,754 | 19,749 | 69.8 | 3.4 |
पोळा | 19 ऑगस्ट 2020 | 6,28,642 | 21,033 | 71.1 | 3.3 |
गणेश चतुर्थी | 22 ऑगस्ट 2020 | 6,71,942 | 21,995 | 71.5 | 3.3 |
दिवाळी | 14 नोव्हेंबर 2020 | 17,44,698 | 45,914 | 92.5 | 2.6 |
भाऊ बीज | 16 नोव्हेंबर 2020 | 17,49,777 | 46,034 | 92.5 | 2.6 |
ख्रिसमस | 25 डिसेंबर 2020 | 19,13,382 | 49,129 | 94.4 | 2.6 |
मकर संक्रांति/पोंगल | 14 जानेवारी 2021 | 19,78,044 | 50,211 | 94.8 | 2.5 |
राज्यात अजूनही 53 हजार अॅक्टिव्ह केस
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 3556 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान राज्यात 3001 संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण बरे झालेल्या रुग्णांचा आकडा वाढून 18,74,279 पर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच एकूण 94.8 टक्के लोक बरे झाले आहेत. राज्यात अजुनही 53,365 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
मुंबईमध्ये ३ लाखांच्या पार पोहोचला संक्रमितांचा आकडा
मुंबईमध्ये बुधवारी कोरोना संक्रमणाचे 675 नवीन प्रकरणे समोर आली. यासोबतच संक्रमितांचा एकूण आकडा वाढून 3,00,471 पर्यंत पोहोचला आहे. मुंबईमध्ये पहिले COVID-19 चे प्रकरण 11 मार्च 2020 ला समोर आले होते. आज 307 दिवसांनंतर हा आकडा 3 लाखांच्या पार पोहोचला आहे.
मुंबईमध्ये 130 दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाखांच्या पार पोहोचला होता आणि त्याच्या पुढच्या 72 दिवसांमध्ये हा आकडा 2 लाखांपर्यंत पोहोचला. आकड्यांनुसार त्यानंतरच्या 105 दिवसांमध्ये आज हा आकडा 3 लाखांच्या पुढे गेला आहे.
मुंबईमध्ये 11 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोना महामारीमुळे एकूण 11,210 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2,80,853 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 7,525 रुग्ण संक्रिय आहेत, ज्यांच्यावर कोविड रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी एकूण 531 लोकांनी कोरोनावर मात केली यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.