आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Pune (Maharashtra) Coronavirus Cases Weekend Lockdown Update | Maharashtra Corona Cases Deaths District Wise Today News; Mumbai Pune Thane Nashik Aurangabad Bhandara Ahmednagar

महाराष्ट्र कोरोना:आता 3 आठवड्यांच्या लॉकडाऊनवर विचार सुरू, मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; राज्यात 24 तासात सापडले 58,993 नवे रुग्ण

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात 97 लाख लोकांना देण्यात आली आहे कोरोना लस

कोरोना रुग्णांची संख्या राज्यात सातत्याने वाढत असताना दिसत आहे. दरम्यान महाराष्ट्रात दोन दिवसांचे कडक लॉकडाऊन सुरू आहे. राज्य सरकाररने शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून सोमवारी सकाळी 7 पर्यंत वीकेंड लॉकडाऊन लागू केलेला आहे. दरम्यान गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 58,993 नवीन रुग्ण सापडले आहेत. हे संपूर्ण जगात आढळलेल्या रुग्णांच्या 7.5% आहे. संक्रमणाचे आकडे सांगणारी वेबसाइट worldometers नुसार शुक्रवारी संपूर्ण जगात 7 लाख 85 हजार 896 नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आता केवळ ब्राझील आणि अमेरिकेतच मिळत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
राज्यात कठोर निर्बंध असूनही कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढच होत आहे. सरकार आता 3 आठवड्यांच्या संपूर्ण लॉकडाऊनच्या तयारीत आहेत. यावर सर्वांचे मत घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून ही बैठक होईल. यामध्ये भाजप लॉकडाऊनचा विरोध करू शकते.

राज्यात 97 लाख लोकांना देण्यात आली आहे कोरोना लस
राज्यात आतापर्यंत 97 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. लसींची कमतरता असूनही शुक्रवारी जवळपास तीन लाख लोकांना लस देण्यात आली. शुक्रवारपर्यंत राज्यात लसीचे 10 लाख डोस उपलब्ध होते. शनिवारसाठी केंद्राकडून एकूण 4.59 लाख डोस मिळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...