आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातून लसीकरण:CM उद्धव ठाकरेंनी व्हॅक्सीनेशन प्रक्रियेची ऑनलाइन केली सुरुवात, मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून साजरा केला आनंद

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्येक केंद्रावर 100 लोकांना लस दिली जाईल.

राज्यात कोरोना लसीकरण अभियान सुरू झाले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात 285 केंद्रांवर लसीकरण केले जाईल. खरेतर गेल्या आठवड्यात हा आकडा 511 ठेवण्यात आला होता. मात्र शुक्रवारी अचानक केंद्राकडून याची संख्या कमी करुन जवळपास कमी करण्यात आली. प्रत्येक केंद्रावर 100 लोकांना लस दिली जाईल. पहिल्या दिवशी 28 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची तयारी आहे.

मुंबईत आनंद साजरा करताना कार्यकर्ते
मुंबईत आनंद साजरा करताना कार्यकर्ते
हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात शालिनीताई मेघे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप गोडे यांनी कोविशिल्ड लस घेतली.
हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात शालिनीताई मेघे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप गोडे यांनी कोविशिल्ड लस घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या दुसऱ्या राज्यांप्रमाणे महाराष्ट्राच्या कूपर रुग्णालय आणि जालना जिल्ह्या रुग्णालयात लसीकरण अभियानाचा शुभारंभ व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून केला.

ठाण्यात सर्वात पहिले कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या हेल्थ इंचार्ज डॉ. अश्विनी पाटील यांना रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये लस देण्यात आली.
ठाण्यात सर्वात पहिले कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या हेल्थ इंचार्ज डॉ. अश्विनी पाटील यांना रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये लस देण्यात आली.

व्हॅक्सीन अपडेट:

  • ठाण्यात सर्वात पहिले कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या हेल्थ इंचार्ज डॉ. अश्विनी पाटील यांना रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये लस देण्यात आली.
  • व्हॅक्सीनेशनच्या सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईच्या घाटकोपर परिसरात दिवाळी साजरी करुन आजचा शुभ दिवस साजरा केला.
  • मुंबईच्या कूपर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळी, आरती आणि फुलांच्या वर्षावाने कोरोना व्हॅक्सीनचे स्वागत केले.
  • पुण्याच्या अनेक हॉस्पिटलमध्ये आणि व्हॅक्सीनेशन सेंटर्सच्या बाहेर रांगोळी काढून तेथे येणाऱ्या लोकांचे स्वागत करण्यात आले.
  • पुण्यात 31 रुग्णालयांमध्ये व्हॅक्सीनेशनची प्रक्रिया सुरु झाली. ही व्हॅक्सीनेशन प्रक्रिया संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालेल. प्रत्येक केंद्रावर 100 लोकांचे पंजीकरण केले गेले आहे.
  • महाराष्ट्राचे राज्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, प्रत्येक दिवशी एकूण 285 सेंटरवर 28 हजार 500 लोकांना कोरोना व्हॅक्सीन दिली जाईल.
बातम्या आणखी आहेत...