आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत बार अँड रेस्तरॉंमध्ये राडा VIDEO:7 ते 8 वेटर्स आणि ग्राहकांमध्ये लाठ्या, खुर्च्यांनी मारामारी; पोलिसांनी सर्वांना घेतले ताब्यात

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील दहिसर परिसरातील एका बार आणि रेस्तरॉंमधील 7 ते 8 वेटर्स व 3 ग्राहकांमध्ये जोरदार मारामारी झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वेटर्सनी अगदी लाठ्या, खुर्च्यांचा वापर करत ग्राहकांवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओही आता समोर आला आहे.

मारामारी करणारे सर्वजण ताब्यात

दहिसरमधील आशिष बार आणि रेस्तरॉंच्या वेटर्सच्या बाहेर हा प्रकार घडला. ऑर्डर वेळेवर न आल्याच्या कारणावरून सुरुवातीला या ग्राहक आणि वेटर्समध्ये वाद झाला. नंतर या वादाचे रुपांतर हाणामारातील झाल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी 7 वेटर्स आणि 3 ग्राहकांना ताब्यात घेतले आहे.

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी

पोलिस उपायुक्त स्मिता पाटील यांनी घटनेबाबत सांगितले की, शुक्रवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास आशिष बार अन्ड रेस्टॉरन्टच्या प्रवेशद्वराजवळच ही घटना घडली. भांडणाची माहिती मिळताच दहीसर पोलिस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. 3 ग्राहक व बार अँड रेस्तरॉंच्या 7 ते 8 कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन मारामारी झाली. एका ग्राहकावर लाठ्या, काठ्या, खुर्च्यांनी हल्ला झाला. पोलिसांनी दोन्ही गटांतील व्यक्तींना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे.

व्हिडिओ फुटेजच्या आधारे कारवाई करणार

पोलिस उपायुक्त स्मिता पाटील यांनी सांगितले की, दोन्ही गटांतील व्यक्तींच्या तक्रारींवरून दहीसर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मारामारीत सहभागी असलेल्या सर्वांना ताब्यात घेतले आहे. मारामारीचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याचाही पोलिस तपास करत आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना अटक करण्याची कारवाई करण्यात येत आहे.