आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पावसाचा जोर:विविध भागांमध्ये साचले पाणी, आदित्य ठाकरेंनी घेतला मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई आणि उपनगराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मुंबईतील सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. याचा वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. हवामान विभागाकडूनही अतिवृष्टीचा इशारा वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याच काळात पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पावसाळी परिस्थितीची पाहणी केली. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला आहे.

मुंबईतील पावसाळी परिस्थितीचा आढावा घेताना मुंबई महापालिकाचे आयुक्त इक्बाल सिंह चहल त्यांच्यासोबत होते. त्यांनी महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरसू यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यानंतर आयुक्त इक्बालसिंह चहल वांद्रे पूर्व परिसरातील ओएनजीसी पातमुखाजवळील भागाची पाहणी केली. यासोबतच, अंधेरी सबवेची पाहणी केली. याशिवाय, मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडूनही पाहाणी करण्यात आली. संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. शासनाने सुट्टी जाहीर केल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांनी घराबाहेर पडण्याची गरज नाही, असे आवाहन इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...