आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पावसामुळे मुंबईची दाणादाण:रस्ते - रेल्वे रुळ जलमय, सखल भागात भरले पाणी; लोकल ट्रेन आणि बस वाहतूक कोलमडली

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई सायन स्टेशनवर चारही बाजुंनी पाणी साचले आहे
  • आज मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालयांनी सुटी

मुंबईत मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांवर रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. आजही मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता सध्या लोकल ट्रेन सेवा बंद करण्यात आली आहे. मुंबईच्या सायन रेल्वे स्थानकात पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून वाहने रस्त्यावर अडकली आहेत.

रेल्वे वाहतूक कोलमडली

पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने रस्त्यात अडकलेल्या वाहन चालकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. पाणी साचलेल्या परिसरातील बेस्ट बस सेवा बंद करण्यात आली आहे. पाणी साचल्याने मुंबई-भुवनेश्वर विशेष रेल्वेगाडी आज रात्री 10 वाजता सोडण्यात येणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर भुवनेश्वर-मुंबई स्पेशल, हावडा-मुंबई स्पेशल, हैदराबाद-मुंबई स्पेशल रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईत सुटी

गोरेगाव, सायन, चेंबूर, कुर्ला, किंग सर्कल, अंधेरी पूर्व, सांताक्रुज यांसारख्या अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेली आहेत. मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी कार्यालये आज बंद ठेवण्यात आली आहेत. महानगरपालिकेने अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे.

लोकल ट्रेन सेवेवरही परिणाम

सायन-कुर्ला, चूनाभट्टी-कुर्ला आणि मस्जिद बंदर स्टेशनवर पाणी साचल्याने सीएसएमटी-ठाणे आणि सीएसएमटी-वसई दरम्यान चालणार्या लोकल रेल्वेसेवेला रिशेड्यूल केले जात आहे. बर्‍याच ठिकाणी लोकल थांबविण्यात आल्या आहेत किंवा 15-20 मिनिटे उशिराने धावत आहेत.

मुंबईसाठी यलो अलर्ट

मंगळवारी सकाळी 8.30 वाजेपासून बुधवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत कुलाबात 147.8 मिमी आणि सांताक्रुजमध्ये 286.4 मिमी पावसाची नोंद झाली. यासंपूर्ण पावसाळ्यात (जूनपासून आतापर्यंत) 3571.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्गसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.