आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईत चोरीचे एक अजब प्रकरण समोर आले आहे. प्रकरण इतके अजब आहे की याला चोरी म्हणावे की गुंतवणूक असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एका कुटुंबाच्या घरात 22 वर्षांपूर्वी चोरी झाली होती. त्याच्या काही दिवसांतच तो मुद्देमाल सापडला. परंतु, कायद्याच्या तंट्यांमुळे हा मुद्देमाल 22 वर्षे पोलिस स्टेशनमध्ये पडून होते. साहित्य चोरीला गेले तेव्हा त्याची किंमत 13 लाख रुपये होती. आता या मुद्देमालाची किंमत तब्बल 8 कोटी रुपये झाली आहे.
1998 मध्ये प्रसिद्ध फॅशन ब्रँड चिराग दिनचे मालक अर्जन दासवानी यांच्या घरात चोरी झाली होती. यात एक सोन्याचे नाणे, दोन सोनेरी ब्रेसलेट तसेच 100 ग्रॅमचे आणि 200 मिलीग्रॅम सोन्याचा समावेश होता. त्यावेळी चोरीला गेलेल्या एकूण सोन्याच्या दागिन्यांची किंमत 13 लाख रुपये आखण्यात आली होती. कोर्टाच्या आदेशानंतर आता हे सोने अर्जन दासवानी यांचा मुलगा राजू दासवानी के बेटे राजू दासवानी यांना सुपूर्द करण्यात आला आहे.
कुटुंबाला वेठीस धरून झाली होती चोरी
अर्जन दासवानी यांच्या कोलाबा येथील घरावर 8 मे 1998 मध्ये ही चोरी झाली होती. त्यावेळी चोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून अख्ख्या कुटुंबाला वेठीस धरले होते. तत्पूर्वी घरात घुसताना सिक्यॉरिटी गार्डला जखमी केले होते. नंतर कुटुंबियांकडून तिजोरीसह सर्व कपाटांच्या चाव्या घेतल्या आणि चोरी केली होती. काही दिवसांनंतर पोलिसांनी त्या चोरांच्या गँगमधील 3 जणांना अटक केली. 1999 मध्ये सर्वांना शिक्षा झाली होती.
सरकारी सुरक्षेत होता जप्त मुद्देमाल
चोरांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे मिळालेला मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणात इतर दोन आरोपी आरोपी फरार होते. अशात त्यांना अटक होत नाही तोपर्यंत कोर्टाने जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांकडे ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु, आरोपी पकडला जात नसल्याने फिर्यादींनी आपले सोने परत मिळविण्यासाठी कोर्टात विनंती केली होती.
आपल्याच वस्तू मिळवण्यासाठी वर्षांचा विलंब चुकीचाच
राजू दासवानी यांनी कोर्टात ही संपत्ती आपलीच असल्याचा दावा करताना पुरावे कोर्टात सादर केले. कोर्टाने त्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून राजू दासवानी यांचा दावा खरा ठरवला. ही संपत्ती पोलिसांकडे ठेवून काहीच अर्थ नाही. दोन फरार आरोपींना पकडण्यात इतक्या वर्षांत यश आले नाही. अशात याचिकाकर्त्यांना आपली संपत्ती परत घेण्यासाठी इतकी वर्षे वाट पाहावी लागत असेल तर ही न्यायाची थट्टा आणि कायद्याचा दुरुपयोग ठरेल.
दरम्यान राजूच्या दोन बहिणी कॅनडा आणि अमेरिकेत राहतात. त्या दोघी या संपत्तीच्या वारसदार आहेत. त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र सुद्धा राजूने कोर्टात सादर केले होते. त्यानंतर पोलिसांनी राजूला सोने परत दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.