आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील निर्भयाचा मृत्यू:साकीनाका येथील 30 वर्षीय बलात्कार पीडितेचा तिसऱ्या दिवशी मृत्यू, दिल्लीच्या निर्भयाप्रमाणे केले होते हाल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही घटना शुक्रवारी रात्री तीन वाजता घडली होती

साकीनाका येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, तिने शहरातील एका रुग्णालयात उपचारांदरम्यान प्राण सोडले आहेत. ती 9 सप्टेंबरला साकीनाका परीसरातील खैरानी रोडवर बलात्कारानंतर बेशुद्धा अवस्थेत सापडली होती. या घटनेत पीडित महिलेसोबत निर्भयासारखे व्यवहार झाल्याचे समोर आले होते.या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आरोपींनी सामूहिक बलात्कारानंतर महिलेच्या खासगी अवयवात रॉड घुसवला होता. यामुळे पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी पीडित महिलेला खैरानी रस्त्यावरून उचलून आणले होते.

सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना गुरुवारी दुपारी 2.30 ते दुपारी 3 च्या दरम्यान घडली. यामध्ये दिसतेय की, आरोपीने बलात्कारानंतर महिलेला रॉडने गंभीर जखमी केले. त्यानंतर तिला दयनीय अवस्थेत पिक-अप व्हॅनमध्ये फेकून पळून गेला. रात्रीच्या अंधारामुळे फुटेज फारसे स्पष्ट नसले तरी आरोपींची हालचाल स्पष्ट दिसत आहे. या फुटेजच्या आधारे आरोपी मोहन चौहान (45) याला अटक करण्यात आली.

मोहित चौहान (45) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मोहित चौहान (45) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीने आपला गुन्हा कबूल केला
साकीनाका पोलिस स्टेशनचे सीपीआय बळवंत जाधव यांचे म्हणणे आहे की हे सीसीटीव्ही फुटेज आरोपी चौहानला शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाचा पुरावा ठरतील. आरोपीला पकडल्यानंतर त्याची कोठडीत चौकशी करण्यात आली आणि जेव्हा त्याला व्हिडिओ फुटेज दाखवण्यात आले तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र सरकारच्या डीजीपींना पत्र लिहून या प्रकरणी कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.

महिलेच्या खासगी अवयवात जखम होती
डॉक्टरांच्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या अंतर्गत भागात जखम झाली होती. महिलेचे ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र तीची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केली होती. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. आरोपीची ओळख मोहन चव्हाण अशी झाली आहे. या प्रकरणामध्ये आणखी आरोपींचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पीडित मुलगी तिच्या दोन मुलींसह मुंबईत राहत होती.
तपासात समोर आले आहे की पीडितेला 13 आणि 16 वर्षांच्या दोन मुली आहेत आणि ती महिला तिच्या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी खाजगी नोकरी करत होती. आरोपीविषयी माहिती मिळाली की, त्याला अमली पदार्थांचे व्यसन आहे आणि गुन्ह्याच्या वेळीही तो नशेत होता.

बातम्या आणखी आहेत...