आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:ट्रॅक ओलांडताना ट्रेनसमोर पडले वृद्ध आजोबा, लोको पायलटने योग्य वेळी ब्रेक लावून जीव वाचवला

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंबईतील कल्याण भागात एका लोको पायलटच्या स्मार्टनेसमुळे 70 वर्षांच्या वृद्ध आजोबांचा जीव वाचला. हे आजोबा रेल्वेरुळ ओलांडून एका प्लॅटफॉर्मवरून दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर जात होते आणि तेवढ्यात अचानक चक्कर येऊन ते रेल्वे रुळावर पडले. या दरम्यान, मुंबई-वाराणसी रेल्वे समोरुन आली. यामुळे ते इंजिनच्या पुढच्या भागात अडकले. परंतु वृद्ध व्यक्तीला खाली पडताना पाहून रेल्वेच्या लोको पायलटने योग्य वेळी ब्रेक लावले आणि त्यांचा जीव वाचला.

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, ही घटना रविवारी दुपारी 12.45 वाजता घडली. ही ट्रेन ठाणे जिल्ह्यातील कल्याण रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांकावरून पुढे जात होती. ट्रेनचा वेग नियंत्रणात होता आणि लोको पायलट एस के प्रधान सतर्क होते, त्यामुळे त्या आजोबांचा जीव वाचवला जाऊ शकला. हरिशंकर असे त्या वृद्ध आजोबांचे नाव आहे.

लोको पायलटने असा वाचवला हरिशंकर यांचा जीव
एस के प्रधान म्हणाले की, ट्रेन कल्याण स्थानकातून सुटताच CPWI संतोष कुमारने वायरलेसवरून सांगितले की, एक वृद्ध व्यक्ती रुळावर पडला आहे. आमची नजर त्यांच्यावर पडण्याआधीच ट्रेन त्यांच्या अगदी जवळ आली होती. यानंतर, मी आणि सहाय्यक लोको पायलट रविशंकर यांनी आपत्कालीन ब्रेक लावले आणि योग्य वेळी ट्रेन थांबवली.

काही सेकंद उशीर झाला असता तर अनर्थ झाला असता. इंजिनच्या पुढील भागामध्ये अडकलेल्या हरिशंकर यांना किरकोळ जखम झाली आहे. सध्या ते फिट असून घरी आहेत.

दोन्ही लोको पायलटांना रेल्वे बक्षीस देणार
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक आलोक कंसल यांनी लोको पायलट व CPWI यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...