आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. मुंबईतील कुर्ल्याच्या criticare रुग्णालयात नवाब मलिक यांना उपचार घेण्यासाठी सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. याशिवाय, परिवारातील एका व्यक्तीला मलिकांसोबत उपचारादरम्यान उपस्थित राहायचीही कोर्टाने मुभा दिली आहे.
मलिक यांची प्रकृती वारंवार बिघडत आहे. त्यामुळे त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी असा अर्ज न्यायालयात करण्यात आला होता. या अर्जावर न्यायालयाने निकाल देत नवाब मलिक यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी दिली.
जे जे रुग्णालयात असताना अयोग्य वागणूक
यापूर्वी नवाब मलिक यांनी न्यायालयात धक्कादायक खुलासा केला होता. ईडी अधिकाऱ्यांनी सलाईन सुरू असताना जबरदस्तीने डिस्चार्ज करून घेतला, असा आरोप त्यांना केला होता. तर पिण्यासाठी पाणी देखील देण्यात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. नाही असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
ईडीकडून 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल
फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. हे प्रकरण मलिकचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि त्याच्याशी संलग्न मालमत्तांच्या खरेदीत पैशाच्या गैरवापराशी संबंधित आहे. ईडीच्या वकिलांनी यावेळी सांगितले की, 5,000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड कारागृहात आहे. यापूर्वी मलिक यांना घरचे जेवण आणि खाजगी रुग्णालयात उपचार करून घेण्यास न्यायालयाने नकार दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.