आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-भाजपत राडा:शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली, मुंबईत झालेल्या राड्यावरुन शेलारांचा जोरदार निशाणा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनासमोर तुफान राडा झाला.

मुंबईमध्ये आज भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तुफान राडा झाला. दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचेही पाहायला मिळाले. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने पुकारलेल्या फटकार मोर्चा दरम्यान शिवसैनिकांनी काही भाजप पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावरुनच आता आशिष शेलारांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्त दाखवली असल्याचा घणाघात शेलारांनी केला.

मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनासमोर तुफान राडा झाला. यानंतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे. दरम्यान आशिष शेलार हे माहीम पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेने महिलेवर हल्ला करुन आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली असल्याचे म्हटले आहे. ज्यावेळी सोनिया आणि वाड्रा आपले देव होतात. त्यावेळी साठे, तेंडुलकर हे शिवसेनेचे शत्रू होतात, अशी घणाघाती टीका आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केलीय. लाथों के भूत बातोंसे नही मानते, यापुढे त्यांना लाथांनीच उत्तर मिळेल, असा इशाराही शेलार यांनी शिवसेनेला दिलाय.

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, 'जेव्हा सोनिया गांधी, रॉबर्ट वाड्रा हे आपले देव बनतात, अशा वेळी तेंडुलकर, साठे आणि आंबेडकर हे शिवसेनेचे शत्रूच होतात. हेच आज या ठिकाणी दिसले आहे. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो असेही शेलार म्हणाले आहे. तसेच 'लातो के भूत बातो से नही मानते.. इसके आगे बातोंसे नही चलेंगे उनको उनकी भाषां मै ही जवाब देंगे..' असे म्हणत शेलारांनी शिवसेनेला इशाराच दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...