आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुहू परिसरातील एका 74 वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पोटच्या मुलाने संपत्तीच्या वादातून बेसबॉल बॅटने आईला मारहाण करत तिची हत्या केली आहे. तर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह कार्टनमध्ये टाकत नोकरासोबत संगनमत करत माथेरानच्या एका दरीत फेकला होता.
नेमके काय आहे प्रकरण?
मुंबईतील जुहू येथील सहाव्या रस्त्यावरील कल्पतरू अपार्टमेंट बिना कपूर या अविवाहित मुलगा सचिन याच्यासोबत वास्तव्यास होत्या. बिना कपूर या गायब झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे बिना कपूर यांचा शोध सुरु केला. तपासणीमध्ये बिना स्वतः घराबाहेर पडताना न दिसल्याने पोलिसांनी त्यांच्या घरावरच लक्ष केंद्रित केले.
असा लागला शोध?
यावेळी बिना कपूर यांचा मुलगा त्यावेळी सचिन व्हीलचेअरवरून एक बॉक्स आणून तो नोकर छोटू मंडल याच्या मदतीने कारमध्ये भरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सचिनच्या मोबाईलचे लोकेशन घेत त्यास ताब्यात घेत आईबद्दल विचारणा सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवताच सचिनने आपण रागाच्या भरात आईची बेसबॉलच्या बॅटने मारत हत्या केल्याची कबुली दिली. पुरावे नष्ट करण्याच्रूा उद्देशाने नोकर छोटूला सोबत घेत मृतदेह कार्टनमध्ये टाकत माथेरानच्या दरीत फेकल्याचे सचिनने पोलिसांना सांगितले.
पोलिस काय म्हणाले?
जुहू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजितकुमार वर्तक म्हणाले की, जुहू परिसरातून वृद्ध महिला गायब झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. यावेळी बिना कपूर यांचा शोध सुरू केला मात्र त्या स्वत: घराबाहेर पडताना दिसून आल्या नाहीत. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे बिना यांचा शोध सुरु केला. यानंतर पोलिसांना त्यांच्या मुलावर संशय आल्याने, त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यातून बिना कपूर यांच्या खुनाचा उलगडा झाला असून पोलिस पथकाला मृतदेह सापडला असून पुढील तपास सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.