आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवस साजरा करणे पडले महागात:अबू आझमी यांनी कोरोनाचे नियम मोडत वाढदिवस केला साजरा, आमदारासह 18 जणांवर गुन्हा दाखल; व्हिडिओ समोर आल्यानंतर कारवाई

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन

कोरोना नियमांचे उल्लंघन करत वाढदिवसाची पार्टी आयोजित केल्याबद्दल समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांच्यासह 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी, अबू आझमींनी घोड्यांच्या गाडीवर बसून भव्य मिरवणूक काढली होती. दरम्यान, या मिरवणुकीमध्ये कोणीही सोशल डिस्टेसिंग आणि मास्क घातलेला नव्हता. विशेष म्हणजे स्वतः समाजवादी नेत्याने मास्क घातले नव्हते.

विशेष बाब म्हणजे या वेळी वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलिसांचे एक पथकही उपस्थित होते. परंतु, कोणीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. समाजवादी पक्ष राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देतो. आता पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहावे लागणार आहे.

अबू आझमी यांनी मिरवणूकीदरम्यान कोणताही मास्क घातला नव्हता.
अबू आझमी यांनी मिरवणूकीदरम्यान कोणताही मास्क घातला नव्हता.

व्हिडिओ समोर आल्यानंतर कारवाई
वाढदिवसाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवाजी नगर पोलिसांनी सपाचे आमदार अबू असीम आझमी यांच्यासह त्यांच्या 18 समर्थकांविरुद्ध महामारी कायद्यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

दोन दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन
संसर्गाचा धोका लक्षात घेऊन अबू आझमी यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या समर्थकांना विनंती केली होती की, त्यांचा वाढदिवस साजरा करू नका. परंतु, समर्थकांच्या या मिरवणुकीमध्ये सपा आमदार अबू आझमी यांनीदेखील कोरोना नियमांचे उल्लंघन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...