आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर उभा होता मृत्यू:​​​​​​​समोरुन येत असलेल्या लोकल ट्रेनला पाहून रुळावर डोके ठेवून झोपली व्यक्ती, अचानक झाला चमत्क्रार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

काही काळ हृदयाचे ठोके थांबवणारी ही घटना शिवडी रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यामध्ये एक व्यक्ती आत्महत्येसाठी रेल्वे रुळावर पडून आहे आणि समोरून भरधाव वेगाने येणारी लोकल ट्रेन येत आहे. रुळावर पडलेला माणूस पाहून मोटरमनने समयसूचकता दाखवत आपत्कालीन ब्रेक लावला आणि काही मीटर अंतरावर ट्रेन थांबवली. यामध्ये त्या व्यक्तीचा जीव वाचला. आता या घटनेचा व्हिडिओ रेल्वे मंत्रालयाने सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यानंतर तो चांगलाच व्हायरल होत आहे.

रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तीन आरपीएफ जवान रुळावर पडलेल्या व्यक्तीला पाहून धावताना दिसत आहेत. मोटरमनच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रेल्वे त्यांचा सन्मान करणार असल्याचेही बोलले जात आहे. ही घटना शनिवारी सकाळी 11.45 वाजताची आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये
क्लिपची सुरुवात रेल्वे रुळावरून फिरत असलेल्या एका व्यक्तीपासून होते. व्हिडिओ जसजसा पुढे जातो आणि ट्रेन जवळ येते तसतसा तो माणूस अचानक रुळांवर झोपतो. त्या माणसाने आपली मान रुळावर ठेवली आणि बाकीचे शरीर रुळांच्यामध्ये ठेवले. मात्र, लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावल्यानंतर ट्रेन लगेच रुळांवर थांबली आणि जीवघेणा अपघात टळला.

रेल्वे मंत्रालयाने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे
रेल्वे मंत्रालयाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मोटरमनने केले कौतुकास्पद काम: मुंबईच्या शिवडी स्टेशनवर, मोटरमनने एका व्यक्तीला रुळावर पडलेले पाहिले, त्याने तत्परतेने आणि समजूतदारपणाने आपत्कालीन ब्रेक लावून त्या व्यक्तीचे प्राण वाचवले. तुमचे जीवन अनमोल आहे, कोणीतरी तुमची घरी वाट पाहत आहे.'

या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले
हा व्हिडिओ एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि 6 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे, तर सुमारे 900 लोकांनी रिट्विट केले आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, 'खरोखरच दुर्घटना टळली. इमर्जन्सी ब्रेकनेही गाडी अचानक थांबत नाही, त्यासाठी अंतरही महत्त्वाचे असते. धन्य मोटरमन महोदय... ज्यांनी योग्य वेळी खूप समज दाखवली.'

बातम्या आणखी आहेत...