आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुग्णालय आग प्रकरण:राकेश वाधवासह 7 जणांविरोधात FIR दाखल, हॉस्पिटलकडे नव्हते फायर NOC; BMC ने दिली होती फक्त 31 मार्चपर्यंत चालवण्याची मंजुरी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी रात्री 11:49 वाजता मॉलमध्ये आग लागली. - Divya Marathi
गुरुवारी रात्री 11:49 वाजता मॉलमध्ये आग लागली.
  • मृतांच्या कुटुंबाला 5-5 लाखांची मदत

मुंबईच्या भांडुप परिसरातील ड्रीम्स मॉल आणि सनराइज हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी लागलेल्या आग प्रकरणी शनिवारी मोठी कारवाई झाली. 11 जणांच्या मृत्यूप्रकरणी BMC च्या तक्रारीवर भांडुप पोलिस स्टेशनमध्ये सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगीच्या त्या घटनेनंतर झालेल्या चौकशीत समोर आले की, ड्रीम्स मॉलकडे फायर NOC नव्हते. काही महिन्यापूर्वी मुंबई सेंट्रलमधील 'सिटी सेंटर मॉल'मध्ये आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडने मुंबईतील सर्व मॉल्समध्ये फायर ऑडिट केले होते. तेव्हा अनेक मॉल्समध्ये फायर सिस्टीम नसल्याचे समोर आले होते. त्यात ड्रीम्स मॉलदेखील होता. फायर ब्रिगडच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'मॉलमध्ये एक हजार दुकाने आहेत. त्यातील सामानामुळे आग पसरली.'

आगीत मॉलचा एक मोठ्या भागाचे नुकसान झाले.
आगीत मॉलचा एक मोठ्या भागाचे नुकसान झाले.

31 मार्चपर्यंतच होती रुग्णालयाला मंजुरी

कोरोना रुग्णालय सुरू करण्यासाठी मागच्या वर्षी रुग्णालयांना अटी शर्तींसह प्रोव्हिजनल NOC देण्यात आली होती. BMC प्रशासनाने काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील सुरक्षेचा आढावा घेतला होता आणि 28 फेब्रुवारीला बंद करण्याचे आदेश दिले होते. नंतर या कालावधी वाढवून 31 मार्च करण्यात आला होता.

या लोकांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी भा.दं.वि. कलम 304 आणि 34 अंतर्गत ड्रीम्स मॉल मॅनेजमेंटच्या राकेश वाधवा (HDIL चेअरमन), निकीता त्रेहान (राकेश वाधवाची मुलगी), सारंग वाधवा (राकेश वाधवाचा भाऊ आणि HDIL ग्रुपचा MD ) आणि दीपक शिर्केसह इतर आरोपी आहेत.

आग सर्वात आधी पहिल्या फ्लोअरवर लागली,यानंतर रुग्णालयापर्यंत पोहचली.
आग सर्वात आधी पहिल्या फ्लोअरवर लागली,यानंतर रुग्णालयापर्यंत पोहचली.

राकेश वाधवा आहे मॉलचा चैअरमन

वरील नावांशिवाय प्रिव्हिलेज हेल्थकेअर आणि सनराइज ग्रुप मॅनेजमेंट, अमित त्रेहान (राकेश वाधवाचा जावई), निकिता त्रेहान, राकेश वाधवाची मुलगी स्वीटी जैनसह इतरही आरोपी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, HDIL द्वारे 2009 मध्ये बनवलेल्या या मॉलचे चेअरमन राकेश वाधवा आहेत. तर, त्यांची मुलगी निकिता त्रेहान सनराइज ग्रुपची MD आहे, जिचे ड्रीम्स मॉलमध्ये सनराइज हॉस्पिटल होते.

मृतांच्या कुटुंबाला 5-5 लाखांची मदत

गुरुवारी रात्री 11:49 वाजता मॉलमध्ये आग लागली होती. फायर ब्रिगेडनुसार, ही लेव्हल 4 ची आग होती. प्रकरणाची माहिती मिळताच, फायर ब्रिगेडची पहिली टीम आर्ध्या रात्री 12:14 वाजता घटनास्थळी दाखल झाली. यानंतर अग्नीशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल होऊन शुक्रवारी दुपारी 2 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. यादरम्यान, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबाला 5-5 लाख रुपयांची मदतीची घोषणा केली.

आग लागताच रुग्णांना इतर ठिकाणी शिफ्ट करण्यात आले.
आग लागताच रुग्णांना इतर ठिकाणी शिफ्ट करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...