आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑनलाइन सट्टेबाजी:YOUTUBE वर लाइव्ह पाहून मुंबईतून कोलकाताच्या रेसकोर्सवर लावत होते सट्टा, 4 जणांना पोलिसांनी केली अटक

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये गँबलिंग अॅक्ट आणि आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन रेसकोर्सच्या घोड्यांवर सट्टा लावणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 4 जणांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या टीमने गुरुवारी माटुंगा परिसरातील संकल्प सिद्धि बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये छापा मारुन एका व्यक्तीला ताब्यात घेतले आणि याच्याकडून माहिती घेतल्यानंतर इतर जणांना अटक करण्यात आली. हे सर्व रॉयल कोलकाता टर्फ क्लबमध्ये सुरू असलेल्या रेसवर सट्टा लावून खेळत होते.

हे सर्व रेसकोर्टची लाइव्ह स्ट्रीमिंग यूट्यूबवर पाहून फोनच्या माध्यमातून सट्टा लावत होते. यांच्याजवळून 10 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या हातात ती लिस्ट देखील लागली आहे, ज्यामध्ये ग्राहकांचे नाव होते आणि त्यांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणात कोट्यावधींची सट्टेबाजी केल्याची शक्यता आहे.

या प्रकरणात सध्या अजून अटक केली जाऊ शकते
सर्वांविरोधात मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये गँबलिंग अॅक्ट आणि आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून हा खेळ सुरू होता. या माध्यमातून लोकांची फसवणूक केल्याचे समोर येऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत जास्तीत जास्त सट्टा लाइव्ह सुरू असलेल्या क्रिकेट मॅचवरच लावला जात होता. या प्रकरणात पोलिसांनी अनेकांना अटकही केली होती.

बातम्या आणखी आहेत...